श्रीसत्यसाई संजीवनी हॉस्पिटलचा हृदय शस्त्रक्रियेत विक्रम
15 Apr 2024 20:45:26
- डॉ. प्रकाश नंदुरकर यांची पत्रपरिषद
यवतमाळ,
येथील Sri Sathya Sai Sanjeevani Hospital श्री सत्यसाई संजीवनी हार्ट हॉस्पिटलद्वारा 30 हजार नवजात बालकांच्या हृदयाच्या दुर्मिळ आजारांवर निशुल्क शस्त्रकि‘या करून मानवसेवेचा एक आदर्श निर्माण केला आहे, असे डॉ. प्रकाश नंदुरकर यांनी सांगितले. सोमवार, 15 एप्रिल रोजी पत्रपरिषदेत ते म्हणाले, भारतात रायपूर (छत्तीसगड), खारघर (नवी मुंबई) आणि पलवल (हरियाणा) या ठिकाणी सुरू असलेल्या श्री सत्यसाई हृदय रुग्णालयांच्या माध्यमातून ही सेवा घडली आहे. संजीवनीचे प्रेरणास्रोत मधुसूदन साई यांनी आपल्या चमूचे अभिनंदन करून, यामुळे 30 हजार बालकांच्या जीवनात बदल झाला असल्याचे म्हटले आहे.
हे परिवार या शस्त्रकि‘येच्या खर्चामुळे कर्जबाजारी होण्यापासून वाचले आहेत. महत्त्वाचे म्हणजे 30 हजार वेळा मानवता व देवावरील विश्वास दृढ झाला आहे, असेही ते म्हणाले. पहिले संजीवनी हार्ट हॉस्पिटल 23 नोव्हेंबर 2012 ला रायपूर येथे सुरू झाले. तेथे प्रसिद्ध हदयसर्जन डॉ. संपतकुमार यांनी पहिली हृदय शस्त्रकि‘या कीर्ती वर्मा हिची केली. कीर्ती आज पूर्णपणे आनंदी जीवन जगत आहे. नुकतीच आझमगडच्या सात वर्षीय सोनाली विश्वकर्मा या बालिकेवर 30 हजारावी हृदयशस्त्रकि‘या करण्यात आली. यावेळी माजी मु‘यमंत्री डॉ. रमणसिंग यांच्या हस्ते ‘गिफ्ट ऑफ लाईफ’ सुपूर्द केले.
Sri Sathya Sai Sanjeevani Hospital : श्री सत्यसाई हेल्थ अँड एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. श्रीनिवास यांच्या मार्गदर्शनात संस्थेचे कार्य अविरत सुरू आहे. त्यांच्या मते 30,000 शस्रकि‘या ही त्यांच्यासाठी अत्यंत समाधानाची बाब आहे. त्यांनी या अद्भुत कामगिरीचे श्रेय सत्यसाई कुटुंबासह, रुग्णांच्या पालकांना दिले जे नि:संशय व विश्वासाने आले होते. जगातच हृदयरुग्णांची संख्या मोठी असून त्यावरील इलाज अतिशय महागडा आहे. त्यामुळे बांगलादेश, पाकिस्तान, श्रीलंका, अफगाणिस्तान येथील रुग्णांवरही येथे इलाज करण्यात आला आहे. ट्रस्टच्या माध्यमातून भारतासोबतच फिजी, श्रीलंका या देशांतही हृदय रुग्णालय सुरू करण्यात आले आहे. श्री सत्यसाई संजीवनी हार्ट हॉस्पिटल ही मोफत शस्त्रकि‘या करणारी जगातील सर्वोत्कृष्ट रुग्णालय शृंखला आहे.