शाहरुख खानच्या या कृतीने जिंकली लोकांची मन

    दिनांक :15-Apr-2024
Total Views |
मुंबई,  
Shah Rukh Khan बॉलीवूडचा सुपरस्टार शाहरुख खान केवळ त्याच्या अभिनयासाठीच नाही तर त्याच्या दयाळू पणासाठीही  जगभरात प्रसिद्ध आहे. किंग खान काहीही करतो, तो त्याच्या चाहत्यांची मने जिंकतो. फिल्म इंडस्ट्रीसोबतच क्रिकेट जगतातही शाहरुख खानची ताकद पाहायला मिळते. सध्या इंडियन प्रीमियर लीगचाउत्साह शिगेला पोहोचला आहे. रविवारी, कोलकाता नाईट रायडर्स आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात ईडन गार्डन्सवर झालेल्या आयपीएल सामन्यात झुंज पाहायला मिळाली, ज्यामध्ये किंग खानची टीम केकेआर जिंकली.

Shah Rukh Khan
 
कोलकाता नाईट रायडर्सच्या विजयाने शाहरुख खानचे चाहते जेवढे खूश होते, तेवढाच शाहरुखही खुश होता. शाहरुख खानचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो सामना संपल्यानंतर पडलेला झेंडा उचलताना दिसत आहे. Shah Rukh Khan शाहरुख प्रत्येकी एक झेंडा उचलताना दिसतो. सुपरस्टार असूनही त्यांनी स्वत: एकेक झेंडा उचलला आणि कर्मचाऱ्यांच्या हाती दिला. किंग खानचा हा गोड हावभाव त्याच्या चाहत्यांची मने जिंकत आहे. सोशल मीडियावर समोर आलेल्या या व्हिडीओवर एका यूजरने शाहरुख खान किती वेळा त्याच मन जिंकेल अशी कमेंट केली आहे.
शाहरुख खानच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, शाहरुख 'टायगर विरुद्ध पठाण' मध्ये दिसणार आहे. याशिवाय ॲटली कुमार 'जवान' या यशस्वी चित्रपटाचा सिक्वेल बनवणार असून, त्याचा हिरो शाहरुख असणार असल्याची चर्चा आहे.