रेल्वेच्या बीएनआर रुग्णालयात आग

    दिनांक :16-Apr-2024
Total Views |
कोलकाता, 
Railway BNR Hospital कोलकात्यातील गार्डनरीच भागात असलेल्या दक्षिण पूर्व रेल्वेच्या सेंट्रल बीएनआर हॉस्पिटलमध्ये मंगळवारी सकाळी आग लागल्याने रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांमध्ये घबराट पसरली आहे. मात्र, या घटनेत कोणीही जखमी झाले नसल्याचे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. ते म्हणाले की, सकाळी 6.40 च्या सुमारास रुग्णालयातील नेत्र विभागात आग लागली. अग्निशमन दलाच्या पाच गाड्यांच्या मदतीने तासाभरात आग आटोक्यात आणण्यात आली.

Railway BNR Hospital
अधिकाऱ्याने सांगितले की, आग लागल्यानंतर विभागातील सर्व रुग्णांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. यात कोणीही जखमी झालेले नाही. रुग्णालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रुग्णालयातील ऑपरेशन थिएटर (ओटी) रूममधील एसी मशिनमध्ये शॉर्टसर्किट झाल्याने ही आग लागल्याचा अंदाज आहे. यानंतर आग वेगाने पसरू लागली. Railway BNR Hospital ड्युटीवर असलेले सुरक्षा कर्मचारी आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी तातडीने रुग्णांना तेथून हटवून दुसऱ्या ठिकाणी हलवले. माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या पाच गाड्या एक एक करून घटनास्थळी पोहोचल्या आणि आग आटोक्यात आणली. आगीचे कारण शोधण्यासाठी पोलिसांनी तपास सुरू केला आहे.