अमेठी, रायबरेली काँग्रेससाठी पेचप्रसंग !

Gandhi Family-Congress या आत्मविश्वासाचा संदेश

    दिनांक :16-Apr-2024
Total Views |
प्रासंगिक
 
 
- राहुल गोखले
Gandhi Family-Congress लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्ष आपापले उमेदवार घोषित करीत असताना काँग्रेससमोर मात्र अमेठी आणि रायबरेली या दोन मतदारसंघांचा पेच उभा आहे. वास्तविक, हे दोन्ही मतदारसंघ केवळ काँग्रेसचेच बालेकिल्ले होते, असे नाही तर गांधी कुटुंबाचे पारंपरिक मतदारसंघही होते. Gandhi Family-Congress अशा मतदारसंघांसाठी उमेदवारांची शोधाशोध करण्याची वेळ काँग्रेसवर यावी हे जितके आश्चर्यकारक तितकेच काँग्रेसमध्ये असलेल्या विश्वासाच्या अभावाचे द्योतक. गेल्या लोकसभा निवडणुकीत (२०१९) अमेठीमध्ये काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा पराभव भाजपा उमेदवार स्मृती इराणी यांनी केला होता. Gandhi Family-Congress केरळमधील वायनाड येथून राहुल गांधी यांनी निवडणूक लढविली नसती आणि तेथे त्यांचा विजय झाला नसता तर २०१९ साली ते लोकसभेत पोहोचू शकले नसते. Gandhi Family-Congress यावेळीही ते वायनाडमधून निवडणूक रिंगणात असले, तरी २००४ पासून २०१९ पर्यंत ज्या अमेठी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व राहुल गांधी यांनी केले तेथे एका पराभवाने त्यांनी धास्ती घ्यावी, हेही केवळ कुटुंबाच्या नावावर मते मिळण्याचा काळ मागे पडल्याचे लक्षण !
 
 
 
Gandhi Family-Congress
 
 
तीच बाब रायबरेली मतदारसंघाची. सोनिया गांधी २००४ पासून या मतदारसंघातून सलगपणे निवडून येत आहेत. मात्र, वय आणि प्रकृती अस्वास्थ्य या कारणांवरून त्यांनी यावेळी लोकसभा निवडणुकांच्या धामधुमीपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे. त्या राज्यसभेच्या मार्गाने संसदेत गेल्या आहेत. Gandhi Family-Congress नुकतीच त्यांनी राज्यसभा सदस्यत्वाची शपथ घेतली. त्यामुळे आता रायबरेलीमध्ये काँग्रेसचा उमेदवार कोण, हा प्रश्न काँग्रेससमोर आहे. रायबरेलीमधून इंदिरा गांधी यांचे पती फिरोज गांधी आणि स्वतः इंदिरा गांधी निवडून येत असत. अमेठीमधून इंदिरा गांधी यांचे पुत्र संजय गांधी, त्यानंतर राजीव गांधी, सोनिया गांधी यांनी त्या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. तेव्हा किती दीर्घकाळ हे दोन्ही मतदारसंघ गांधी कुटुंबाचे पारंपरिक मतदारसंघ होते, याची कल्पना येईल. याच रायबरेली मतदारसंघात राज नारायण यांचा इंदिरा गांधी यांनी १९७१ सालच्या निवडणुकीत पराभव केला होता आणि त्यातून उद्भवलेल्या न्यायालयीन लढ्याचा निकाल आपल्याविरोधात गेल्यानंतर इंदिरा गांधी यांनी थेट आणिबाणी लागू केली होती. Gandhi Family-Congress अमेठी काय किंवा रायबरेली काय, दोन्ही ठिकाणी काँग्रेसचे उमेदवार कॅप्टन सतीश शर्मा यांनी एखाद-दोन वेळा मिळविलेल्या विजयाचा अपवाद वगळता हे दोन्ही मतदारसंघ गांधी कुटुंबाचेच मतदारसंघ म्हणून ओळखले जात.
 
 
या दोन्ही मतदारसंघांमध्ये पाचव्या टप्प्यात म्हणजे २० मे रोजी मतदान होणार असल्याने उमेदवार घोषित करण्यास अद्याप सवड आहे, हा युक्तिवाद ग्राह्य धरला तरी त्यातील तोकडेपण लगेचच यामुळे सिद्ध होते की, त्याच टप्प्यात मतदान होणाऱ्या  उत्तरप्रदेशातीलच अन्य जागांवरील उमेदवार काँग्रेसने जाहीर केले आहेत. Gandhi Family-Congress वायनाड मतदारसंघात २६ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. त्यानंतर अमेठी आणि रायबरेली येथील काँग्रेस उमेदवारांची घोषणा होईल, असे म्हटले जाते. रायबरेलीतून प्रियांका गांधी आणि अमेठीतून राहुल गांधी निवडणूक लढवतील अशी वदंता आहे. वस्तुतः कोणत्याही पक्षातील वरिष्ठ पातळीवरील नेत्यांची उमेदवार म्हणून घोषणा पहिल्या यादीत करण्याचा प्रघात असतो. याचे कारण तेथे विजय पक्षाने पक्का मानला आहे, या आत्मविश्वासाचा संदेश त्यातून जातो. Gandhi Family-Congress त्या पृष्ठभूमीवर रायबरेली आणि अमेठीत काँग्रेसने उमेदवारांची घोषणा करण्यात केलेली दिरंगाई त्या पक्षाच्या चलबिचलीचे द्योतक. कदाचित राहुल आणि प्रियांका गांधी दोघेही उत्तरप्रदेशातून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आणि दोघेही पराभूत झाले तर काँग्रेसची शोभा होईलच; पण काँग्रेसमध्ये गांधी कुटुंबाची पतही शिल्लक राहणार नाही. गांधी कुटुंबाशिवाय काँग्रेस पक्ष चालूच शकत नाही, या समजुतीला धक्का बसेल.
 
 
 
Gandhi Family-Congress अमेठी आणि रायबरेली येथे गांधी कुटुंबाच्या सदस्यांना निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला तर पडद्याआडून सूत्रे नियंत्रणात ठेवण्याचा शहाजोगपणा गांधी कुटुंबाला करता येणार नाही. अगोदरच जी-२३ या गटाने पक्ष संघटनेत आमूलाग्र बदल करण्यासाठी दबाव आणला होता. त्यापैकी काहींनी कालांतराने पक्षाला सोडचिठ्ठी दिली तर काहींनी आपले शस्त्र म्यान केले. गेल्या दोन लोकसभा निवडणुकांत काँग्रेसची कामगिरी सुमार राहिली आहे. आताही ती कितपत सुधारेल याविषयी साशंकता आहे. Gandhi Family-Congress त्यातच भरीस भर म्हणून गांधी कुटुंबाने रायबरेली आणि अमेठीत ‘हात' दाखवून अवलक्षण करून घेतले तर पक्षात मोठा असंतोष निर्माण होईलच; पण त्यापेक्षाही धोका म्हणजे गांधी कुटुंबाला पक्षावर नियंत्रणास मुकावे लागेल. हे सर्व धोके गांधी कुटुंबाला दिसत नसतील असे नाही आणि त्यामुळेच या दोन प्रतिष्ठेच्या मतदारसंघांत उमेदवारी कोणाला द्यायची, यावर निश्चिती होत नसावी. कदाचित यावर मध्यमार्ग म्हणून राहुल आणि प्रियांका यापैकी एकच जण उत्तरप्रदेशात निवडणूक रिंगणात उतरेल, असाही तोडगा निघू शकतो. Gandhi Family-Congress मध्यंतरी सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वढेरा यांनी आपण निवडणुकीत उमेदवार असू शकतो, असे संकेत दिले होते.
 
 
 
काँग्रेस कार्यकर्त्यांची तशी भावना असल्याचे त्यांनी म्हटले आहे. आपण १९९९ सालापासून अमेठीत काँग्रेसचा प्रचार करीत आहोत आणि त्यामुळे अमेठीत आपण उमेदवार असावे यासाठी कार्यकत्र्यांचा आग्रह आहे, असेही त्यांनी म्हटले असल्याने स्मृती इराणी यांच्याविरोधात वढेरा काँग्रेसचे उमेदवार असतील का, अशी चर्चा आहे. Gandhi Family-Congress तसे होण्याची शक्यता कमी आहे. राहुल गांधी पराभूत होतात तेथे इराणी यांच्यासमोर वढेरा तग धरू शकतील, हे असंभवनीय. उमेदवाराने पूर्वपुण्याईवर भिस्त ठेवावी; अवचित येऊन जनतेला अभिवादन करून जावे आणि आपल्या पारड्यात मते पाडून घ्यावी तो काळ आता मागे सरला असल्याची प्रतिक्रिया अमेठीतील एका मतदाराने दिल्याचे एका वृत्तपत्राने उद्धृत केले होते. मतदारांची मानसिकता त्यातून ध्वनित होते. अशा स्थितीत वढेरा अमेठीत निवडणूक जिंकतील याची शक्यता कमीच. Gandhi Family-Congress पर्याय राहतो तो अन्य कोणत्या उमेदवारांना उतरविण्याचा. त्यातून गांधी कुटुंब पराभवाच्या धोक्यापासून दूर राहील; पण पक्षाचे नेतृत्व असे पलायनवादी असल्याचा संदेश त्यातून जाईल. तोही धोका लहान नाही. कोणताही पर्याय निवडला तरी धोका आहेच; पण धोका न स्वीकारणाऱ्यांना नेतृत्व म्हणून अधिमान्यतादेखील मिळत नसते, हेही विसरता येणार नाही.
 
 
 
काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खडगे हेही यंदा उमेदवार असणार नाहीत. त्यांनी २००९ आणि २०१४ ची लोकसभा निवडणूक कर्नाटकातील गुलबर्गा मतदारसंघातून जिंकली होती. Gandhi Family-Congress मात्र, २०१९ च्या निवडणुकीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. त्या पराभवाचे उट्टे काढण्यासाठी खडगे यांनी आपले जावई राधाकृष्ण दोड्डामणी यांना उमेदवारी दिली. एकीकडे गांधी कुटुंबाचे जावई निवडणूक लढण्याची इच्छा प्रकट करीत आहेत तर दुसरीकडे पक्षाध्यक्षांचे जावई निवडणूक लढवत आहेत. पण स्वतः निवडणूक लढविणे ही पक्षातच नव्हे तर विरोधकांच्या तंबूतदेखील आपले स्थान बळकट करण्याची खडगे यांच्यासाठी संधी आहे. Gandhi Family-Congress अमेठी किंवा रायबरेली यापैकी एका मतदारसंघातून निवडणूक लढविण्याचा विचार खडगे यांनी का करू नये? तसे ते करतील का? हा प्रश्न आहे. या सगळ्याचा अर्थ एकच की, या नेत्यांना पक्षात चैतन्य निर्माण करण्यापेक्षा पक्षात आपल्या वैयक्तिक इभ्रतीची आणि स्थानाची जास्त चिंता आहे. अशाने पक्ष संघटना झडझडून कामाला लागेल, अशी अपेक्षा करणे व्यर्थ. अमेठी आणि रायबरेली हे काँग्रेस आणि विशेषतः पक्ष नेतृत्वासाठी पेचप्रसंग ठरत आहेत, हेच खरे! Gandhi Family-Congress
 
 
९८२२८२८८१९