ग्रंथ, भाषा, मंदिरे ही आपल्या अस्तित्वाची वैशिष्ट्ये

    दिनांक :16-Apr-2024
Total Views |
- प्रवीण योगी यांचे प्रतिपादन
- रामस्मरण व्याख्यानमालेचा समारोप
 
नागपूर, 
वेद, उपनिषदे त्यानंतर वेदांतसूत्र, भगवद्गीतेपर्यंतचा आपला ज्ञानाचा प्रवास असून ग्रंथ, भाषा, मंदिरे ही आपल्या अस्तित्वाची वैशिष्ट्ये असल्याचे प्रतिपादन भारतीय विद्या, मंदिरे व किल्ल्यांचे अभ्यासक Praveen Yogi प्रवीण योगी यांनी केले. रेशीमबाग येथील महर्षी व्यास सभागृहात केशवनगर सांस्कृतिक सभा आणि कलासंगम, कला-सांस्कृतिक मंडळाच्या संयुकत विद्यमाने सुनील देवउपाध्ये यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ सुरू असलेल्या तीन दिवसीय रामस्मरण व्याख्यानमालेच्या समारोप प्रसंगी ते बोलत होत.
 
 
ramsamaran-reshimbag
 
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जायका मोटर्सचे कुमार काळे तर केशवनगर सांस्कृतिक सभेचे किशोर धाराशिवकर, मुकुल मुळे, कलासंगम सांस्कृतिक मंडळाचे रवी ढोके तसेच जयंत खळतकर आदींची प्रमुख उपस्थिती होती. ‘बिंबब्रह्म आणि वास्तुब्रह्म’ हा व्याख्यानाचा विषय होता. सरस्वती शिशू मंदिर, नंदनवनच्या शिक्षिका अनघा घाटे यांच्या मार्गदर्शनात शाळेच्या विद्यार्थ्यांनी ‘तुझविण रामा मज कंठवेना’ हे रामगीत सादर केले.
 
गुणांची पूजा करणारा समाज
अयोध्येतील श्रीराममंदिरासह मार्कंडा मंदिर, वेरुळ, अजिंठा, निंलंगा, मेहकर इत्यादी ठिकाणच्या देव-देवतांच्या शिल्पांची वैशिष्ट्ये यावेळी Praveen Yogi प्रवीण योगी यांनी आपल्या व्याख्यानात सांगितली. ते पुढे म्हणाले, श्रीराम, श्रीकृष्ण, श्रीशंकर हे गुण असून या गुणांची पूजा करणारा आपला भारतीय समाज आहे. विविध प्रकारच्या मूर्ती अनेक देवळात दिसून येतात. त्या आपल्या शिल्पकारांनी घडवल्या असून त्यात आपल्या भावनांचे अनेक रंग दिसून येते.
 
स्वत:ला ओळखण्यात आनंद
आपल्या मार्गदर्शनात कुमार काळे म्हणाले, मनुष्याला आनंदाची खरी अनुभूती ही वस्तू, पद किंवा प्रतिष्ठेने मिळत नाही.तर खरा आनंद हा स्वत:ला ओळखण्यात असतो. आपल्या अंत:करणात असलेल्या श्रीरामाची ज्याला जाणीव होते त्याला स्व मधील परब्रह्माची जाणीव होते व जीवन सफल होते. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रकाश एदलाबादकर यांनी केले. व्याख्यानमालेच्या यशस्वीतेसाठी केशवनगर प्रभात शाखेचे सुनील सांगोळे, मिलींद भाकरे, प्रकाश वाघमारे तसेच हेडगेवार स्मारक समितीचे सहकार्य लाभले.