पंतप्रधान मोदींच्या विकास कार्याला साथ द्या : खा. तडस

16 Apr 2024 10:34:21
तभा वृत्तसेवा
वर्धा, 
Prime Minister Modi वर्धा जिल्ह्यातून नागपूर, यवतमाळ, वरुड, मोर्शी, अमरावती नागपूरला जाण्यासाठी किती वेळ लागत होता हे सर्वांना माहित आहे. आज महामार्ग विकास कामामुळे आपल्या कमी वेळात पोहोचत आहे, असे अनेक विकास कामे प्रत्येक क्षेत्रात झालेली आहे. त्यामुळे वर्धा लोकसभा क्षेत्राचा चेहरामोहरा बदलत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकासात्मक कार्याला पाठींबा देण्याकरिता साथ देण्याचे आवाहन महायुतीचे उमेदवार रामदास तडस यांनी केले.
 
 
Prime Minister Modi
 
आष्टी येथे भाजपा महायुतीचे प्रचार कार्यालयाचे उद्घाटन प्रसंगी भाजपा महायुतीचे उमेदवार खा. रामदास तडस यांनी केले. यावेळी आ. दादाराव केचे यांची उपस्थिती होती. कार्यालय उद्घाटनानंतर बोटोना, पार्डी, एकांबा, पालेरा, बोरगाव ढोले, राजनी, बोंदरठाणा, सोनेगाव, सावळी एकार्जुंन, माळेगाव काळी येथे पदयात्रा व प्रचार संवाद यात्रा संपन्न झाली. यावेळी आ. दादाराव केचे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गरिबांसाठी जात-पात-धर्म याचा विचार न करता केवळ राष्ट्रविकासासाठी सबका साथ, सबका विकास, सबका प्रयास, सबका विश्वास या तत्त्वानुसार काम करीत आहेत. Prime Minister Modi सर्व सामान्य जनतेला गरीब कल्याण योजनेच्या माध्यमातुन त्यांचा विकास करण्याचे कार्य करीत आहे. वर्धा लोकसभा क्षेत्रातसुद्धा मोठ्या प्रमाणात योजनेचा लाभ मिळालेला आहे. या योजनांच्या माध्यमातून विकास होत असल्यामुळे देशाच्या व वर्धा लोकसभाचा विकास करण्याकरिता महायुतीचे उमेदवार रामदास तडस यांना साथ देण्याचे आवाहन आ. केचे यांनी केले. यावेळी विधानसभा प्रमुख बाळा कांदुरकर, भाऊ खवशी, प्रशांत सव्वालाखे, कमलाकर निंभोरकर, मनिष ठोंबरे, राजेेंद्र रोकडे, बबन कामडी, खुशाल मोहिते, अनिल मोहिते, राजू टिपले, मंगेश कवारे, प्रदीप श्रीराव, अजय टिपले, संजय ठाकरे, पालोरा येथे निरंजन डोंगरे, प्रकाश गाखरे, युवराज मुने, हरिभाऊ ढोबळे, मनोज ढोले, चंदु घागरे, नारायण चौधरी, सुरेश कालोकार, मोहन शेळकी, रामदास गळहाट, गुणवंत घागरे व महायुतीच पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Powered By Sangraha 9.0