नागपूर,
UPSC exam result केंद्रीय लोकसेवा आयोगाचा २०२३ चा अंतिम निकाल आज जाहीर झाला आहे. यात महाराष्ट्रासह नागपूरच्या निकालाचा टक्का वाढला आहे. गेल्या दोन परीक्षांमध्ये यूपीएससीचे पहिले तीन क्रमांक मुलींनीच पटकावल्याचे दिसून आले होते. यंदा मात्र मुलांनी बाजी मारली आहे. दरम्यान आदित्य श्रीवास्तव देशात पहिला तर अनिमेश प्रधान देशात दुसरा आला आहे. यात नागपूरसह विदर्भातील विद्यार्थ्यांचाही समावेश आहे.
यंदा नागपूरमधून चार विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर नागरी सेवा पूर्व प्रशिक्षण केंद्राच्या पाच विद्यार्थ्यांनी बाजी मारली आहे. यंदा यूपीएससीच्या परीक्षांमध्ये १०१६ उमेदवार उत्तीर्ण झाले आहेत. UPSC exam result यामध्ये ३४७ उमेदवार खुल्या प्रवर्गाचे, ११६ उमेदवार आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गाचे, ३०३ उमेदवार ओबीसी प्रवर्गाचे, १६५ उमेदवार अनुसूचित जाती प्रवर्गाचे तर ८६ उमेदवार अनुसूचित जमाती प्रवर्गाचे आहेत.
नागरी सेवा मुख्य परीक्षा डिसेंबर महिन्यात घेण्यात आल्या होत्या. त्याचा निकाल मार्च रोजी जाहीर होऊन यात उत्तीर्ण होण्याऱ्या विद्यार्थ्यांच्या ऑगस्ट महिन्यात मुलाखती घेण्यात आल्यात.नागपूरमधून उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांमध्ये सुरेश बोरकर(६५८), मयुरी महल्ले (७९४), प्रांजली खांडेकर(७६१), शुभम डोंगरदिवे (९६३) यांचा समावेश आहे. तर पूर्व प्रशिक्षण केंद्रामधून उत्तीर्ण झालेल्यांमध्ये राजेश्री देशमुख(६२२), शुभम पवार(५६०), शुभम डोंगरदिवे(९६३ ), चिन्मय बन्सोड(८९३), अपूर्व बालपांडे(५४६) यांचा समावेश आहे. यंदा विदर्भातील विद्यार्थ्यांचा टक्का वाढल्याचे चित्र आहे. पूर्व परीक्षा प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून यंदा ९२ विद्यार्थ्यांनी मुलाखतीची तयारी केली होती. यावर्षी नागपूर आणि विदर्भातील उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढली आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षांचे निकाल
upsconline.nic.in आणि
upsc.gov.in या संकेतस्थळांवर सविस्तर निकाल पाहाता येईल.