UPSC टॉपर आदित्य श्रीवास्तव कोण आहे? जाणून घ्या

16 Apr 2024 17:32:46
 नवी दिल्ली,
UPSC CSE 2023 Topper :  केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) नागरी सेवा परीक्षा (CSE) 2023 चा निकाल जाहीर केला आहे. लखनौचा राहणारा आदित्य श्रीवास्तव या परीक्षेत अव्वल ठरला आहे. त्याने ऑल इंडिया रँक 1 मिळवला आहे. अनिमेश प्रधान (AIR 2) दुसऱ्या स्थानावर आणि डोनुरू अनन्या रेड्डी (AIR 3) तिसऱ्या स्थानावर आहे.
 
 
AADITYA
 
 
कोण आहे आदित्य श्रीवास्तव?
 
आदित्य श्रीवास्तव हा मूळचा लखनौ, यूपीचा आहे. सध्या ते पश्चिम बंगालमध्ये प्रशिक्षणाखालील आयपीएस अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. त्यांचे वडील अजय श्रीवास्तव हे केंद्रीय लेखापरीक्षण विभागात AAO म्हणून कार्यरत आहेत.
 
आदित्यला एक लहान बहीणही आहे, जी दिल्लीत सिव्हिल परीक्षेची तयारी करत आहे. त्यांची आई आभा श्रीवास्तव एक सामान्य गृहिणी आहे. आदित्यचे बालपण लखनऊच्या मावैया भागात गेले आणि त्याचे सुरुवातीचे शिक्षण सीएमएस अलीगंजमध्ये झाले. 12वी उत्तीर्ण झाल्यानंतर आदित्यने आयआयटी कानपूरमधून बीटेक केले आणि काही दिवस खासगी कंपन्यांमध्ये काम केल्यानंतर तो आयपीएस आणि आता आयएएसची परीक्षा उत्तीर्ण झाला.
Powered By Sangraha 9.0