नागपूर,
Emperor Ashoka जनकल्याणकारी चक्रवर्ती सम्राट अशोक यांची २३२८ वीं जयंती जनहित युवा फाऊंडेशन आणि प्रज्ञा बुद्ध विहार व वाचनालय यांच्या वतीने जगदिशनगर येथे साजरी करण्यात आली.प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ धम्मप्रचारक राजकुमार तलवारे, ज्येष्ठ समाजसेवक गौतम ढोक, प्रज्ञा बुद्ध विहार व वाचनालयाचे प्रभारी प्रकाश जगताप, जनहित युवा फाऊंडेशनचे उपाध्यक्ष प्रतिक ढोक, कार्यकारी सदस्या प्रियंका गजभिये, प्रज्ञा महिला मंडळाच्या प्रमुख शिल्पा शेंडे प्रामुख्याने उपस्थित होते.यावेळी राजकुमार तलवारे म्हणाले सम्राट अशोकांनी आत्मिक शांतीसाठी राजपाठाचा त्याग केला व धम्मप्रचारासाठी आपला लाडका मुलगा महेन्द्र व मुलगी संघमित्रा यांना धम्मप्रचारक बनवून सातासमुद्रापार धम्मप्रचारासाठी पाठविले. त्यांच्या त्याग व समर्पणामुळेच विश्वात धम्माची बीजे रोवली गेली व जगात धम्मक्रांति झाली असे त्यांनी आपल्या भाषणात सांगितले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मयुर रामटेके, नागेश बडोले, किरण मोरे, बाबाराव रामटेके, योगेश गजभिये, जयेश पोहरकर, सुषमा ढोक, पांचाली जगताप, प्रिया बडोले, संगिता पोहरकर, दिपाली शेंडे, रत्ना नारनवरे, अनुसया शिंगारे, संगिता शेंडे, संजना रामटेके, उषा कानफाडे, कमलाबाई गजभिये,Emperor Ashoka शुभांगी तलवारे, रत्नमाला शेंडे, हिवंका रामटेके यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार शिवशंकर ताकतोडे यांनी व्यक्त केले.कार्यक्रमाला मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
सौजन्य: शिवशंकर ताकतोडे, संपर्कमित्र