दान करा राष्ट्रासाठी !

Political Party-Vote-Election 2024 सर्वाधिक जबाबदारी

    दिनांक :17-Apr-2024
Total Views |
वेध
 
- विजय निचकवडे
Political Party-Vote-Election 2024 दातृत्वाचा आव आणणारे अनेक आहेत. पावभर देऊन किलोभर दाखविणारेही आम्ही पाहिले आहेत. पण खरे दातृत्व तेच असते, जिथे स्वार्थ नसतो. केवळ केलेल्या दानातून कुणाच्या तरी कल्याणाची आस असते. मग ती व्यक्ती सापेक्ष असो, देश किंवा  समाज; खरंच आज असे दातृत्व क्वचितच सापडते. Political Party-Vote-Election 2024 आता देश, राष्ट्रहितासाठी नि:स्वार्थ दान देण्याची वेळ आली आहे. कदाचित या दानाचे महत्त्व प्रत्येकाच्या दृष्टीने सारखे नसेल; मात्र एका मताचे दान परिवर्तनाची नांदी ठरू शकते, याचाही विचार शेवटी आपल्यालाच करावयाचा आहे. Political Party-Vote-Election 2024 लोकशाहीच्या उत्सवातील महत्त्वाचा दिवस अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपला आहे. निवडणूक म्हणजे केवळ राजकीय पक्ष, त्यांचे कार्यकर्ते किंवा उमेदवार यांचीच जबाबदारी नाही.
 
 
Political Party-Vote-Election 2024
 
यांच्या सोबत सर्वाधिक जबाबदारी निभवायची असते, ती मतदारांना. आपण सामान्य असू; मात्र आपले मत असामान्य आहे, याची जाणीव प्रत्येकाला होणे गरजेचे आहे. Political Party-Vote-Election 2024 आज आमची मानसिकता काय आहे; तर माझे एक मत नाही पडले, मतदान नाही केले तर काय फरक पडतो, असा विचार करणारी. हा विचार आपण केवळ आपल्यापुरता करतो. प्रत्येक जण जर असाच विचार करणार असेल तर ‘थेंबे थेंबे तळे साचे' या उक्तीप्रमाणे ही संख्या वाढून मतांवर प्रभाव टाकण्यास आणि लायक प्रतिनिधी निवडण्याच्या दृष्टीने घातक ठरते. Political Party-Vote-Election 2024 मतदानाची सुटी आम्हाला मिळते; आम्ही फिरायला जाण्याचे नियोजन करतो. कंटाळा आला म्हणून मतदान केंद्रापर्यंत जाण्याचे सौजन्य दाखवत नाही. हीच मानसिकता आज लोकशाहीला घातक ठरत आहे.
 
 
तुमचे एक मत किती महत्त्वाचे आणि निर्णायक असते, याची जाणीव तेव्हा होते, जेव्हा एखादा उमेदवार एका मताने जिंकतो किंवा पराभूत होतो. Political Party-Vote-Election 2024 आज आम्हाला परिवर्तन हवे आहे. देशाची पर्यायाने आपल्या भागाची आणि आपलीही प्रगती हवी आहे. पण त्यासाठी थोडा त्रास घेऊन मतांचे दान देण्याची मन:स्थिती आमची नाही. आम्ही अजूनही आपल्या मतांची ताकद ओळखली नाही. ती ओळखली असती, तर मतांची टक्केवारी वाढावी म्हणून शासन-प्रशासनाला जनजागृती करावी लागली नसती. Political Party-Vote-Election 2024 सार्वत्रिक निवडणुका या अनेक दशकांपासून होत आहेत. परंतु, प्रत्येक निवडणुकांच्या वेळी मतांची टक्केवारी वाढावी, लोकांनी मतदानासाठी घराबाहेर पडावे यासाठी आवाहन करावे लागते, हे आमचे दुर्दैव! आम्ही स्वतःला सुशिक्षित म्हणतो, पण हाच सुशिक्षितपणा आमच्या कर्तव्याच्या आड येतो.
 
 
Political Party-Vote-Election 2024 मतदान हे राष्ट्रीय कर्तव्य म्हणून आम्ही मानतो खरे, पण त्या कर्तव्याला जपतो का? हा खरा प्रश्न आहे. शहरी भागातील लोक अती सुशिक्षितपणामुळे घराबाहेर पडत नाहीत तर ग्रामीण भागात कुठली तरी लालसा ठेवून घरापर्यंत कुणी येण्याची वाट पाहिली जाते. बरेचदा या प्रतीक्षेत मतदानाची वेळ निघून जाते आणि आम्ही आपल्या कर्तव्याला मुकतो. आम्ही रक्तदान करून त्याला पवित्र दान म्हणत असतो; पण त्यातही आता व्यावसायिकता आली आहे. Political Party-Vote-Election 2024 मग रक्त देणारा असो किंवा ते विकणाऱ्या ब्लड बँक असो. याला काही अपवाद नक्कीच आहेत. हाच प्रकार मतदानाच्या बाबतीतही दिसत आहे. कुणी खायला-प्यायला देतो तर कुणी हातात चार-दोन पैसे टिकवून तुमचे मत विकत घेतो. ते आम्ही हसत हसत विकून मोकळे होतो. अशावेळी आम्ही खरंच आमच्यासोबतच प्रामाणिक आहोत का? याचाही विचार व्हायला हवा.
 
 
६० ते ७० टक्के होणारे मतदान कोणत्याही अर्थाने लोकशाहीला पोषक नाही. मतदानासाठी घराबाहेर न पडणारा बुद्धिजीवी माणूस आणि मत विकणारा स्वार्थी मतदार योग्य मतदाराच्या निवडीत बाधा आणू शकतो. Political Party-Vote-Election 2024 आम्ही आमच्या कर्तव्याचे पालन करीत नाही आणि नंतर नावं ठेवण्यासाठी, बोट ठेवण्यासाठी मोकळे होतो. अशावेळी मात्र आपल्यालाही कुणाला नावे ठेवण्याचा किंवा बोलण्याचा अधिकार राहात नाही. १९ एप्रिल रोजी मतदानानिमित्त सुटी आहे आणि पुढच्या दोन सुट्या लागून आल्या आहेत. Political Party-Vote-Election 2024 अशावेळी पर्यटनाचे नियोजन न करता सशक्त, समृद्ध राष्ट्रासाठी मतदानाला जाण्याचे नियोजन करा. निर्णयक्षम, कणखर नेतृत्व देशाला कसे मिळेल, यासाठी आपला हातभार कसा लागेल, याची जाणीव ठेवून वागणूक झाली तरच आपण आपल्या राष्ट्रीय कर्तव्याप्रती प्रामाणिक राहू शकू.
९७६३७१३४१७