कॉन्स्टेबलचा मुलगा यूपीएससी उत्तीर्ण

17 Apr 2024 18:32:47
तभा वृत्तसेवा
पुसद,
Shubham pawar pass UPSC : पुसद शहर पोलिस ठाण्यात हेड कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत असलेल्या सुरेश पवार यांचा मुलगा शुभम याने यूपीएससी परीक्षेत घवघवीत यश मिळविले आहे. त्याने देशभरातून ५६० वी रँक मिळविली आहे.
 
 
y17Apr-Pawar
 
 
शुभमचे मूळ गाव उमरखेड तालुक्यातील वालतूर असून सध्या तो महागाव येथे वास्तव्यास आहे. शुभमचे प्राथमिक शिक्षण किनवट, माध्यमिक शिक्षण आर्णी व नांदेड, तर पदवीचे शिक्षण पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला येथे झाले. त्याने मागील पाच वर्षे ऑनलाईन माध्यमातून अभ्यास करून यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली. एक वर्ष दिल्ली येथेसुद्धा यूपीएससी परीक्षेचा त्याने अभ्यास केला. शुभम आता प्रशासकीय अधिकारी होणार आहे. त्याने आपल्या यशाचे श्रेय वडील सुरेश, आई संगीता व भाऊ भूषण यांच्यासह शिक्षकांना दिले आहे.
Powered By Sangraha 9.0