गोंदिया,
UPSC-Gondia-Kajal जिद्द, परिश्रम, चिकाटी, प्रखर बुद्धिमत्तेच्या बळावर कोणतीही गोष्ट साध्य करता येते, हे गोरेगावच्या काजल आनंद चव्हाण हिने दाखवून देत ‘यूपीएससी’ परीक्षेत देशात 753 वा क्रमांक प्राप्त केला आहे. UPSC-Gondia-Kajal उल्लेखनीय म्हणजे, काजल ही गोंदिया जिल्ह्यातून चर्मकार समाजातील युपीएससी उत्तीर्ण करणारी पहिली विद्यार्थीनी ठरली आहे. UPSC-Gondia-Kajal काजलचे वडील व्यवसायिक असून आजोबा बी. टी. चव्हाण सेवानिवृत्त केंद्र प्रमुख तर मोठे वडील कमल चव्हाण सडक अर्जुनी तालुक्यातील शेंडा येथील शासकीय आदिवासी आश्रमशाळेत पदवीधर शिक्षक आहेत. UPSC-Gondia-Kajal काजलने प्रशासकीय सेवेत जावे ही तिच्या आजोबांची इच्छा आहे.
त्यांचे स्वप्न साकार करण्यासाठी काजलने अथक परिश्रम घेत पहिल्याच प्रयत्नात यश प्राप्त केले. काजलचा लहान भाऊ नेहाल अभियंता असून तो ही युपीएससीची तयारी करीत आहे. UPSC-Gondia-Kajal काजलचे 10 वी पर्यंतचे शिक्षण गोंदियातील खासगी शाळेत झाल्यानंतर 12 वी पर्यंतचे शिक्षण गोरेगाव येथील शहिद जान्या तिम्या जिल्हा परिषद कनिष्ठ महाविद्यालयातून केले. यानंतर गोरेगावच्या जगत महाविद्यालयात विज्ञान व कला शाखेत पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण करून दिल्ली येथे यूपीएससी पूर्वपरिक्षेची तयारी केली. UPSC-Gondia-Kajal ऑनलाईन अभ्यास करून युपीएससी उत्तीर्ण करणारी चर्मकार समाजातून जिल्ह्यातील काजल पहिली विद्यार्थीनी ठरली. जगत महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापकांनी काजलला विशेष मार्गदर्शन केले. काजल ग्रामीण भागातील होतकरू विद्यार्थ्यांसाठी प्रेरणास्त्रोत ठरली असून तिचे सर्वत्र कौतूक होत आहे. UPSC-Gondia-Kajal