अहिल्यादेवी होळकरांचे वंशज भूषणसिंहराजेंच्या हाती तुतारी

18 Apr 2024 16:23:03
पुणे, 
Bhushan Singh Raje : राजमाता अहिल्यादेवी होळकर आणि मल्हारराव होळकर यांचे वंशज भूषणसिंहराजे होळकर यांनी गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटात प्रवेश केला. होळकर यांची महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
 
 
tutari
 
होळकर हे आधी भाजपासोबत होते. पण, गेल्या काही दिवसांपासून त्यांची शरद पवारांसोबत जवळीक वाढली होती. त्यांनी पवार यांची भेट घेतली होती. या भेटीपासूनच भूषणसिंह हे शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. अखेर आज त्यांनी महाविकास आघाडीच्या पुण्यातील रॅलीमध्ये तुतारी हाती घेत शरद पवार गटात प्रवेश केला. त्यांच्या पक्षप्रवेशामुळे शरद पवार यांना बारामती लोकसभा मतदारसंघात मोठा फायदा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कारण, या मतदारसंघामध्ये धनगर मतदारांची संख्या जास्त आहे.
Powered By Sangraha 9.0