यंदा देशाच्या विकासात पाऊसही सकारात्मक !

Monsoon-Election 2024 "अल निनो"चा प्रभाव संपणार ?

    दिनांक :18-Apr-2024
Total Views |
वेध
 
 
- संजय रामगिरवार
 
Monsoon-Election 2024 सध्या देशात निवडणुकीचे वारे वाहत आहेत. लवकरच मान्सूनचेही वारे वाहतील. मान्सूनचा पहिला दीर्घकालीन अंदाज भारतीय हवामान खात्याने जाहीर केला आहे. Monsoon-Election 2024 यंदा दक्षिण-पश्चिम मान्सून तुलनात्मकरीत्या चांगला असणार आहे. सरासरीपेक्षा जवळपास सहा टक्के जास्त पाऊस यावर्षी होणार आहे, जी आनंदाची वार्ता आहे. गतवर्षी हाच पाऊस सरासरीपेक्षा तेवढाच म्हणजे सहा टक्क्यांनी कमी झाला होता. Monsoon-Election 2024 याचाच अर्थ, यंदा पाऊसही भारतावर मेहरबान आहे. देशाच्या विकासात तोही सकारात्मक भूमिका वठवण्याच्या तयारीत आहे. येणारा काळ देशाच्या भविष्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. देश विकसित होण्याकडे वाटचाल करीत आहे. Monsoon-Election 2024 अशावेळी चांगल्या पावसाची, पर्यायाने देशातील कृषी उत्पन्नाच्या वाढीची आणि महागाईमध्ये घट होण्याची ही नांदी आहे, असे मानायला हरकत नाही.
 
 
Monsoon-Election 2024
 
Monsoon-Election 2024 अवकाळी पावसानंतर आता विदर्भात बऱ्यापैकी तापायला सुरुवात झाली आहे. एप्रिलच्या मध्यात आपण आहोत तेव्हा वैदर्भीय तापमान ४१ अंशाच्या आसपास आहे. येत्या काही दिवसात ते ४५ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचू शकते. जिवाची लाही लाही करणाऱ्या या तापमानानंतर पावसाची सुरुवात आल्हाददायक वाटणारी असेल. अशाच वेळी पावसाने दिलेली सकारात्मक साद मनाला दिलासा देणारी आहे. तसा दक्षिण-पश्चिम मान्सून जून ते सप्टेंबर दरम्यान येतो. त्यानंतर ऑक्टोबर ते नोव्हेंबर पावसाचे निवर्तन सुरू होते. Monsoon-Election 2024 दक्षिण-पश्चिम मान्सून सरासरी ८७ सेंटीमीटर एवढा असतो. यंदा तो त्यापेक्षा सहा टक्क्यांनी वाढणार आहे. कारण ‘अल निनो'चा प्रभाव संपणार आहे आणि त्याचवेळी ‘ला निनो' प्रभावी ठरणार आहे. ‘अल निनो'च्या प्रभावात पाऊस कमी, तर ‘ला निनो' काळात पाऊस चांगला होतो.
 
 
 
भारतासाठी मोसमी वारे महत्त्वाचे आहेच. ते अरब सागर आणि बंगालच्या खाडीतून देशात प्रवेशतात. जवळपास ७५ टक्के पाऊस त्याचाच परिणाम असतो. भारताच्या जमिनीचा भाग आणि समुद्राचा भाग यातील तापमानातील फरकाच्या स्थितीचे हे संकेत आहेत. सूर्याची किरणे समुद्रातून लवकर परावर्तित होतात. Monsoon-Election 2024 त्यामुळे तेथील तापमान कमी असते आणि जमिनीच्या भागात सूर्याच्या किरणांचे परावर्तन होत नसल्याने तापमान वाढते. समुुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार होतो आणि वारे थेट भारताच्या जमिनीकडे वळतात. कारण तिकडे जास्त दाबाचा पट्टा तयार झालेला असतो. ही भौगोलिक स्थिती आपल्या देशातील मान्सूनसाठी खास आहे. कदाचित म्हणून आपला देश महान आहे. समुद्री वारे सर्वात आधी केरळकडे वळतात आणि तिकडून आपल्या मान्सूनला सुरुवात होते.
 
 
Monsoon-Election 2024 यावर्षी अगदी वेळेत या भागात पाऊस येणार असल्याचाही अंदाज आहे. जवळपास त्याच वेळी ते मुंबईलगतच्या टेकड्यावर आदळतील आणि तिकडे जोरदार पाऊस होईल. यंदा ऑगस्ट ते सप्टेंबरपर्यंत ‘ला निनो'ची स्थिती मान्सूनसाठी अधिकच पोषक ठरणार आहे. ५ जून ते ३० सप्टेंबरपर्यंतच्या काळात देशात सरासरीपेक्षा जास्त पाऊस होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातही यंदा पाऊस चांगला राहणार आहे. ८ जूनपर्यंत तो राज्यात आलेला असेल. पावसाळ्यात हिंद महासागरातील द्विध्रुवीय स्थितीचा अंदाजही सकारात्मक राहणार आहे. Monsoon-Election 2024 तसेच उत्तर गोलार्धात बर्फाचे आवरण कमी राहणार असून या दोन्ही स्थिती नैर्ऋत्य मान्सूनसाठी अधिक अनुकूल ठरणार आहे. याचा परिणाम देशात चांगले कृषी उत्पन्न आणि त्या माध्यमातून महागाई कमी होण्यात होईल; जे देशाच्या विकासासाठी चांगले संकेत आहेत.
 
 
देशातील निवडणुकाही त्याच दिशेने चालल्या आहेत. येणाऱ्या काळात पुन्हा भाजपाच्या नेतृत्वाखालील रालोआचे सरकार सत्तास्थानी आरूढ होण्याचे संकेत विविध माध्यमांतून व्यक्त होत आहेत. या सरकारकडे येणाऱ्या काळात कोणत्या दिशेने आणि किती वेगाने आपण विकास करणार आहोत, याचा आराखडा आहे. Monsoon-Election 2024 देशाचे वातावरणही सर्वार्थाने त्यासाठी अनुकूल असल्याचे संकेत हवामान खात्याच्या अंदाजाने मिळत आहेत. याचाच अर्थ, येणाऱ्या  काळात आपण एक विकसित राष्ट्र होण्यासाठी जी वाटचाल करणार आहोत, त्यासाठी सध्याची एकूण परिस्थिती ही शुभसंकेत देत आहे, असे म्हणायला हरकत नाही.
९८८१७१७८३२