नवनीत राणा यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य

-संजय राऊतांच्या पोस्टरला चपलांनी बदडले -भाजपाच्या महिला कार्यकर्त्या आक्रमक

    दिनांक :18-Apr-2024
Total Views |
तभा वृत्तसेवा
अमरावती,
Navneet Rana : भाजपाच्या उमेदवार खा. नवनीत राणा यांच्याबद्दल शिवसेना ठाकरे गटाचे नेते खा. संजय राऊत यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. त्याचा निषेध भाजपाच्या महिला कार्यकर्त्यांनी गुरूवारी रात्री राजकमल चौकात केला. त्यांच्या पोस्टरला चपला मारून संताप व्यक्त केला.  सायबर पोलिस ठेवणार समाजमाध्यमांवर लक्ष
 
 
RANA
 
 
  खा. राऊत काँग्रेसचे उमेदवार बळवंत वानखडे यांच्या प्रचारासाठी अमरावतीत आले होते. गुरूवारी दुपारी त्यांनी उबाठा शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. या मेळाव्यात त्यांनी भाजपा उमेदवार नवनीत यांच्याबद्दल आक्षपार्ह वक्तव्य केले होते. भाजपाच्या महिला कार्यकर्त्यांनी सदर वक्तव्यावर जोरदार आक्षेप घेतला असून गुरूवारी रात्री राजकमल चौकात भाजपा आणि युवा स्वाभिमानच्या महिलांनी संजय राऊतच्या पोस्टरला जोडे व चपला मारून जोरदार निषेध केला. महिलांबद्दल अपशब्दांचा वापर करणार्‍या राऊत यांच्या पोस्टरवर महिलांनी बांगड्या सुद्धा फेकून मारल्या. आक्रमक झालेल्या महिलांनी राजकमल चौकात काहीवेळ ठिय्या आंदोलन केले. संजय राऊत यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी राजापेठ पोलिस स्टेशनवर धडक दिली.
 
 
अमरावती शहर भाजपा महिला मोर्चा अध्यक्ष गंगा खारकर यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. यावेळी सुरेखा लंगरे, शितल वाघमारे, संगीता बुरंगे, भारती गुहे, सुमती ढोके, अलका तिवारी, माया लकडे प्रिया तिरथकर यांच्यासह अनेक महिला कार्यकर्त्या सहभागी झाल्या होत्या.