सुनेत्रा पवारांनी दाखल केला उमेदवारी अर्ज

18 Apr 2024 18:52:35
मुंबई, 
Sunetra Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी बारामती लोकसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज गुरुवारी दाखल केला.
 
 
SUNETRA
 
 
सकाळी अजित पवारांनी सपत्नीक दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेऊन पूजाअर्चना केली. त्यानंतर एका भव्य रॅलीने शक्तिप्रदर्शन करीत सुनेत्रा पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. ही भाव-भावकीची, भावनिक मुद्यांची qकवा पवार विरुद्ध पवार अशी निवडणूक नसून, मोदी विरुद्ध राहुल गांधी अशी निवडणूक असल्याचे अजित पवार म्हणाले.
 
अजित पवारांनीही दाखल केला अर्ज
 
 
सुनेत्रा पवारांसह अजित पवारांनीदेखील उमेदवारी अर्ज दाखल केला. अर्ज दाखल करतेवेळी अजित पवारांसोबत विजय शिवतारे उपस्थित होते. प्रत्येक पक्ष सावधतेचे पाऊल म्हणून आपल्या अधिकृत उमेदवारासोबत एक डमी अर्ज दाखल करीत असतो. अधिकृत उमेदवाराच्या अर्जसंदर्भात कुठली अडचण आल्यास पर्यायी उपाय म्हणून अशी सावधगिरी प्रत्येक पक्ष बाळगत असते. त्याच धरतीवर अजित पवारांनी हा अर्ज दाखल केला असल्याचे दिसते.
Powered By Sangraha 9.0