लग्नात चोरी करणारा निघाला अल्पवयीन

    दिनांक :18-Apr-2024
Total Views |
तभा वृत्तसेवा
दर्यापूर, 
Theft in Marriage : शहरातील बनोसा स्थित शेतकरी सदनात आयोजित लग्न समारंभातून एका महिलेच्या पर्समधील वधुचे दागिने, मोबाईल व रोख रक्कम भरदुपारी चोरीला गेल्याची घटना 4 एप्रिल रोजी घडली होती. या प्रकरणी नवरदेव आकाश पळसकर यांनी दर्यापूर पोलिसात तक्रार दाखल केली होती. दरम्यान स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक समांतर तपास करीत असताना गुप्त माहितीच्या आधारे दर्यापुरातील राजपुत पुर्‍यातील एका अल्पवयीन युवकास ताब्यात घेतले असता त्याने या गुन्ह्याची कबुली दिली.  नवनीत राणा यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य
 
 
 
ksajf
 
सायबर पोलिस ठेवणार समाजमाध्यमांवर लक्ष  दरम्यान, चोरी प्रकरणातील अल्पवयीन युवकाच्या ताब्यातून पंचासमक्ष 3 ग्रॅम सोन्याचे कानातले, एक मोबाईल व 2 हजार रोख असा एकूण 27 हजाराचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला. ही कारवाई पोलिस अधीक्षक विशाल आनंद, अप्पर पोलिस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या मार्गदशनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरण वानखडे, पोलिस उपनिरीक्षक सजंय शिंदे, अंमलदार त्र्यंबक मनोहर, सुनील महात्मे, सुधीर बावने, सैय्यद अजमद, नीलेश डांगोरे, दिनेश कानोजिया, रितेश वानखडे यांनी केली. घटनेतील अल्पवयीन युवकावर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती ठाणेदार संतोष ताले यांनी दिली.