चला ब्रह्मांड फिरू या...!

Universe-Earth-Milky Way मनाचा वेग सर्वाधिक

    दिनांक :18-Apr-2024
Total Views |
वेध
 
 
- पुंडलिक आंबटकर
Universe-Earth-Milky Way ब्रह्मांडाचा व्याप नेमका किती असेल? असा प्रश्न प्रत्येक सुज्ञ मनुष्याला जीवनात नक्कीच पडतो. ब्रह्मांडाचा व्याप मोजण्याची क्षमता मनुष्यात नाही. आपला सूर्य पृथ्वीपासून १४ कोटी ९६ लाख किलोमीटर अंतरावर आहे. सूर्य पृथ्वीपेक्षा आकाराने अंदाजे १ लाख पट मोठा आहे. Universe-Earth-Milky Way अर्थातच त्यात पृथ्वीसारखे १ लाख ग्रह सहज सामावून जातील! आपण ज्या आकाशगंगेत राहतो, तिला इंग्रजीत ‘मिल्की वे' आणि मराठीत ‘मंदाकिनी' म्हणून ओळखले जाते. आपली आकाशगंगा १ लाख प्रकाश वर्षे अंतरात विस्तारलेली आहे. प्रकाशाचा वेग सेकंदाला ३ लाख किलोमीटर इतका आहे. अशा परिस्थितीत आपण प्रकाशाच्या वेगाने प्रवास केला तरी संपूर्ण आकाशगंगा फिरण्यासाठी आपल्याला १ लाख पृथ्वी वर्षे लागतील! Universe-Earth-Milky Way आश्चर्य म्हणजे, इतकी वर्षे फिरूनही अवकाशात तुम्हाला खूप कमी कालावधी लागेल. मात्र, पृथ्वीवर १ लाख वर्षे उलटून गेलेली असतील! कारण अवकाशाला वेळ ही बाब लागू होत नाही. अवकाशात वेळ खूपच संथगतीने प्रवास करते. Universe-Earth-Milky Way त्यामुळे जेव्हा तुम्ही पृथ्वीवर परत याल तेव्हा तुम्हाला येथे कोणीही ओळखणार नाही!
 
 
Universe-Earth-Milky Way
 
शास्त्रज्ञांच्या अंदाजानुसार ब्रह्मांडात जवळपास १० हजार कोटी आकाशगंगा अस्तित्वात आहेत. यातील प्रत्येक आकाशगंगेत २० हजार कोटी तारे व असंख्य ग्रह सामावलेले आहेत. Universe-Earth-Milky Way परंतु, हा केवळ अंदाज तेवढा आहे. कारण जगात मनुष्याच्या मनाचा वेग सर्वाधिक आहे आणि मन जेवढ्या वेगाने प्रवास करू शकते त्याच्या हजारोपट वेगाने ब्रह्मांडाचा विस्तार होत जातो. एकूणच ब्रह्मांड अनंत आणि अनादी आहे. मनुष्याचं मन कल्पनेच्या पलीकडे प्रवास करू शकत नाही. मात्र, त्याहीपलीकडे अनंत ब्रह्मांडाचे अस्तित्व आहे. अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था नासाने हबल टेलिस्कोपच्या मदतीने आतापर्यंत ३ हजार आकाशगंगा शोधून काढलेल्या आहेत. ब्रह्मांडाला दिशा लागू नसतात. Universe-Earth-Milky Way ज्याप्रमाणे आपण मागे-पुढे, खाली-वर अशा दिशा ठरवतो, त्याप्रमाणे ब्रह्मांडात दिशा ठरवता येत नाही. पृथ्वीच्या फिरण्यामुळे आपण नेहमी खालून वर आणि वरून खाली तसेच अन्य सर्व बाजूंनी प्रवास करीत राहतो. घरी बसूनच आपण कोट्यवधी किलोमीटरचा प्रवास करीत असतो.
 
 
 
परंतु, पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे आपल्याला आकाश नेहमी वरच असल्याचे जाणवते. संपूर्ण ब्रह्मांड गतिमान आहे. सूर्य आपल्या मूळ जागी स्थिर असला तरी तो आकाशगंगेच्या केंद्राची परिक्रमा करतो आणि सूर्यासोबत संपूर्ण तारामंडळसुद्धा आकाशगंगेच्या केंद्राची परिक्रमा करतात. Universe-Earth-Milky Way या परिक्रमेदरम्यान अरबो किलोमीटरचा प्रवास आपल्याला घरच्या घरी घडतो. आपल्या शेजारील गुरू हा तारामंडळातील सर्वात मोठा ग्रह आहे. वास्तविक गुरू हा एक मृत तारा आहे. कारण, त्याचे बहुतांश अस्तित्व हायड्रोजनमुळे आकारास आलेले आहे. परंतु, त्याच्यात ऊर्जा संयोगाची (न्युक्लिअर फ्युजन) क्षमता नसल्याने गुरूला ग्रह ही संज्ञा देण्यात आली आहे. गुरू स्वयंप्रकाशित असता तर तो ब्रह्मांडातील सर्वात छोटा तारा म्हणून गणला गेला असता. Universe-Earth-Milky Way हा ग्रह पृथ्वीपेक्षा आकाराने अंदाजे १३०० पट मोठा आहे. तारामंडळातील दुसऱ्या क्रमांकाचा मोठा ग्रह म्हणून शनीला ओळखले जाते. हासुद्धा एक गॅसवर्गीय ग्रह आहे. या ग्रहाला सुंदर अशी रिंग असून साध्या दुर्बिणीतून या ग्रहाचे सौंदर्य न्याहाळणे शक्य आहे.
 
 
ब्रह्मांडात प्रकाशाचा वेग सर्वाधिक असल्याचे शास्त्रज्ञ सांगतात. परंतु, प्रकाशाच्या वेगापेक्षा मनुष्याच्या मनाचा वेग अरबोपट अधिक आहे. Universe-Earth-Milky Way त्याहून अधिक वेग ब्रह्मांडाच्या विस्ताराचा आहे. ब्रह्मांडात रोज लाखो तारे मरतात आणि त्याहून अधिक तारे रोज जन्मसुद्धा घेतात! हा जन्ममरणाचा खेळ कोणी मांडला असेल? जिथे मनुष्याच्या कल्पनेचा विस्तार संपतो; तिथूनच खèया अर्थाने ब्रह्मांडाला सुरुवात होते. हे ब्रह्मांड विनाकारण अस्तित्वात आले असेल का? नक्कीच नाही! त्यामागे नक्कीच काहीतरी अर्थ दडलेला आहे. परंतु, भौतिक स्वरूपात आकारास आलेल्या मनुष्य जिवाला त्याचा उलगडा करता येणे शक्य वाटत नाही. qहदू धर्मग्रंथांनी सूक्ष्म देहाची संकल्पना मांडलेली आहे. Universe-Earth-Milky Way परंतु, हिंदू धर्मग्रंथ आणि विज्ञानाची सांगड घालण्यात आपण अपयशी ठरलो. आज ही बाब प्रकर्षाने जाणवत आहे. याबाबत संशोधन झाले तर नक्कीच आपल्याला ब्रह्मांडातील रहस्ये उलगडण्यात काही प्रमाणात का होईना, यश आल्याशिवाय राहणार नाही.
९८८१७१६०२७