भटक्या समूह लवकरच मुख्य प्रवाहात !

पोहरादेवी सुजात आंबेडकर यांचे प्रतिपादन

    दिनांक :18-Apr-2024
Total Views |
मानोरा, 
backward classes वंचित बहुजन आघाडी च्या माध्यमातून भटया जाती समूहाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे प्रयत्न असून, भटक्या जाती समाज बांधवांच्या सामाजिक आणि राजकीय उत्थानासाठी अग्रेसर राहणार असल्याचे प्रतिपादन वंचित चे नेते सुजात आंबेडकर यांनी केले.
 

qwqwq 
 
backward classes तीर्थक्षेत्र पोहरादेवी येथे श्रीराम नवमी निमित्त वंचित बहुजन आघाडीचे नेते सुजात प्रकाश आंबेडकर यांनी विविध देवस्थानांना भेटी देऊन माथा टेकला. देवी जगदंबा, संत सेवालाल महाराज संस्थान, संत बामणलाल, संत सुकालाल, संत डॉ.रामराव महाराज व संत हमुलाल (भक्तीधाम) आदी देवस्थानांचे दर्शन युवा नेते आंबेडकर यांनी घेतले. स्थानिक अध्यात्मिक क्षेत्रातील बाबूसिंग महाराज, सुनील महाराज, जितेंद्र महाराज आदींचे आशिर्वाद सुद्धा आंबेडकर यांनी यावेळी घेतले.भक्तीधाम येथे उपस्थितांना मार्गदर्शन करताना तथागत गौतम बुद्ध यांनी हजारो वर्षांपूर्वी जगत कल्याणासाठी सांगितलेला मार्ग संत शिरोमणी सेवालाल महाराजांनी सुद्धा काही शतकांपूर्वी सांगितल्याचे आंबेडकर यांनी उद्गार काढले.सामाजिक,शैक्षणिक, आर्थिक आणि राजकीय हक्कापासून सातत्याने वंचित ठेवण्यात आलेल्या भटया समूहातील विविध जाती मधील विकासाचा अनुशेष भरून निघावा यासाठी वंचित बहुजन आघाडी सध्या व मागील अनेक वर्षांपासून सुद्धा प्रयत्न करत असल्याचे आंबेडकर यांनी पोहरादेवी येथे प्रतिपादन केले.