वीज पडल्याने शेतीपयोगी साहीत्य जळाले !

माहुली येथील घटना

    दिनांक :18-Apr-2024
Total Views |
मानोरा, 
lightening strike तालुक्यातील माहुली येथे १७ एप्रील रोजी सांयकाळी ७ वाजताच्या सुमारास वीजाच्या कडकडाटासह वादळीवारा व पाऊस आला. नागरीक वीजच्या आवाजाने भयभीत झाले होते. याच दरम्यान माहुली येथील ओमप्रकाश नागोराव सावंत याच्या शेतातील निंबांच्या झाडावर वीज पडली. त्यामुळे जनावरासाठी पशुपालकांनी १० बैलगाडया तुरीचे कुटार जमा केले होते, त्याला आग लागली व जवळच असलेले तुषार सिंचनाचे पाईप जळून खाक झाले.
 
 
5656
 
lightening strike मानोरा तालुक्यात गेल्या तीन दिवसापासून वादळी पावसाने थैमान घातले. काही भागात गारपीटही झाली. अशातच १७ एप्रिल रोजी सायंकाळच्या दरम्यान वादळी वार्‍यासह अवकाळी पावसाला सुरूवात झाली. दरम्यान ओमप्रकाश सावंत यांच्या शेतात वीज पडून त्यामध्ये शेतीपयोगी साहीत्य जळून खाक झाले. यामध्ये शेतकर्‍याचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. सदर शेतकर्‍यांनी पंचनामासाठी तलाठी यांच्याशी संपर्क केला. मात्र, ते निवडणुका कामात व्यस्त असल्याने प्रत्यक्ष पाहणी झाली नाही. तेव्हा शासनाने त्वरीत नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी ओमप्रकाश सावंत यांनी केली आहे.