पोलिंग पार्टी कर्मचार्‍यांना विशेष आरोग्यसेवा !

18 Apr 2024 18:29:31
गोंदिया, 
loksabha 2024  लोकसभा सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रमानुसार पहिल्या टप्प्यात 19 एप्रिल रोजी भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघात मतदान करण्यासाठी गोंदिया जिल्हाधिकारी प्रशासनामार्फत तयारी पूर्ण झालेली आहे. यातंर्गत जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदार संघात पोलिंग पार्ट्या व साहित्य आज, 18 एप्रिल रोजी रवाना झाले. पोलिंग पार्ट्यांतील अधिकारी व कर्मचार्‍यांना जिल्हा आरोग्य प्रशासनाच्या आरोग्य पथकामार्फत आरोग्य सेवा प्रदान करण्यात आली.
 

wewewew 
 
loksabha 2024  यात देवरी येथील आरोग्य पथकामध्ये सामुदायिक आरोग्य अधिकारी यशस्वी चौरसिया, आरोग्यसेविका कल्पना ढोमणे, आरोग्यसेवक ओमप्रकाश लेदे, वाहन चालक विजय भेलावे यांनी, तिरोडा तालुक्यात आरोग्य पथकात डॉ. सुबोध थोटे तालुका आरोग्य अधिकारी, लिलाधर निपाने आरोग्य सहाय्यक, निमवैद्यकीय कर्मचारी सुरेश येरणे, प्रीती बोरकर, विजय चंद्रिकापुरे, विश्‍वजित चव्हाण, आरोग्यसेविका कुंदा साखरवडे, आरोग्यसेवक अनमोल चव्हाण यांनी, गोंदिया तालुक्यात आरोग्यसेवक जगदिश उके, आरोग्यसेविका अश्‍विनी गोंधुडे व वाहन चालक शेखर शरणागत यांनी आरोग्य सेवा दिली.
Powered By Sangraha 9.0