मालदीवचे माजी राष्ट्राध्यक्ष यामेन यांची सुटका

    दिनांक :19-Apr-2024
Total Views |
- लाचखोरीच्या आरोपात होते तुरुंगात
 
माले, 
भारतावर बहिष्काराची भाषा बोलणारे मालदीवचे माजी राष्ट्राध्यक्ष Abdullah Yamen अब्दुल्ला यामेन यांची लाचखोरीच्या आरोपातून न्यायालयाने सुटका केली आहे. 21 एप्रिल रोजी मालदीवमधील संसदीय निवडणुका होण्यापूर्वी कोर्टाचा हा निर्णय आला आहे. यामेन 480 दिवस भ्रष्टाचाराच्या प्रकरणांमध्ये शिक्षा भोगत होते. तथापि, त्यांना सभा घेण्यात सूट देण्यात आली होती. यामेन यांची प्रोग्रेसिव्ह पार्टी ऑप मालदीव विरोधी आघाडीचा एक भाग होती, ज्याने भारताविरोधी भावनांचा फायदा घेण्यासाठी ‘इंडिया आऊट’ मोहीम सुरू केली. यामेन यांनीच भारताविरुद्ध नकारात्मकता पसरविली आणि स्वत:ला शिक्षा झाल्यावर मोहम्मद मुईज्जू यांना राष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनविले.
 
 
Abdullah Yamen
 
480 दिवसांपासून शिक्षा भोगत असलेल्या यामेनवर लाच घेण्याचा आरोप आला. रिसॉर्ट लीजच्या व्यवहारात 1.1 दशलक्ष अमेरिकन डॉलर्सची लाच घेण्यात आणि तिला कायदेशीर ठरवल्याबद्दल कोर्टाने यामेनला दोषी ठरवले. 25 डिसेंबर 2022 रोजी कोर्टाने त्यांना 11 वर्षांच्या तुरुंंगवासाची शिक्षा सुनावली आणि 5 दशलक्ष डॉलर्स दंड ठोठावला. मार्च 2023 मध्ये यामेन यांनी या शिक्षेविरुद्ध अपील केले. यावर जून 2023 मध्ये सुनावणी सुरू झाली. नंतर कोर्टाने सर्व आदेश फिरवले. कोर्टाने पुन्हा एक नवीन बाजू ठेवण्याचा आणि खटला चालविण्याचा आदेश दिला आहे.
 
 
या अहवालानुसार, गेल्या वर्षी मोहम्मद मुईज्जू राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर Abdullah Yamen अब्दुल्ला यामेन यांना तुरुंगातून बाहेर काढून त्यांना नजरकैदेत ठेवण्यात आले होते. असे असूनही ते सार्वजनिक सभांना संबोधित करीत होते. आता कोर्टाने यामेन यांची सुटका करताना म्हटले की, लाचखोरीच्या प्रकरणात पुन्हा वावू आरा द्वीपावर पुन्हा खटला चालविला जाईल.