बीसीसीआयने हार्दिक पांड्यावर ठोठावला 12 लाखांचा दंड

    दिनांक :19-Apr-2024
Total Views |
मुंबई,  
Hardik Pandya बीसीसीआयने मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याला 12 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. पंजाब किंग्जविरुद्ध मुंबई इंडियन्सच्या विजयानंतर बीसीसीआयने हार्दिक पांड्याला ही शिक्षा दिली. मुल्लानपूरमध्ये झालेल्या सामन्यात स्लो ओव्हर रेटमुळे मुंबई इंडियन्सला लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. पंजाब किंग्जविरुद्ध मुंबई संघाला षटके वेळेवर पूर्ण करता आली नाहीत, त्यामुळे बीसीसीआयने हार्दिक पांड्यावर कारवाई केली आहे.
 
Hardik Pandya
 
वास्तविक, बीसीसीआयने पंजाब किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स सामन्यानंतर एका प्रकाशनात म्हटले आहे की, मुंबई इंडियन्सचा कर्णधार Hardik Pandya हार्दिक पांड्याला दंड ठोठावण्यात आला आहे कारण त्याचा संघ निर्धारित वेळेत संपूर्ण षटके टाकू शकला नाही. आयपीएलच्या किमान ओव्हर रेटच्या गुन्ह्यांशी संबंधित आचारसंहितेनुसार या हंगामातील मुंबई संघाचा हा पहिला गुन्हा आहे. पंड्याला 12 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
मुंबई इंडियन्स संघ नियोजित वेळेपेक्षा 2 षटके मागे धावत होता आणि त्यामुळे संघाला 19व्या आणि 20व्या षटकात 30 यार्ड सर्कलमध्ये अतिरिक्त क्षेत्ररक्षक ठेवावा लागला. मात्र, यामुळे मुंबईचे कोणतेही नुकसान झाले नाही आणि मुंबई संघाने पंजाब किंग्जचा 9 धावांनी पराभव करत सामना जिंकला. चालू मोसमातील मुंबई इंडियन्सची ही पहिली चूक होती, ज्यामुळे बीसीसीआयने हार्दिक पांड्याला १२ लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. मुंबई संघाने दुसऱ्यांदा ही चूक केली तर कर्णधार हार्दिकला 12 लाखांऐवजी 24 लाखांचा दंड ठोठावला जाईल. त्यांच्याशिवाय इतर खेळाडूंनाही शिक्षा होणार आहे.