भ्रम एक आजार !

Congress-Election2024-Vidarbha लोकसभेचा बिगुल वाजला

    दिनांक :19-Apr-2024
Total Views |
मुंबई वार्तापत्र
 
 
- नागेश दाचेवार
 
 
Congress-Election2024-Vidarbha ‘भ्रम' हा एक आजार आहे म्हणतात. भ्रामक कल्पना करीत सुटलेली व्यक्ती या आजाराचा शिकार आहे, असे म्हटले जाते. भ्रम हा आजार जडला की, मग अशा भ्रामक अवस्थेत असलेला तो व्यक्ती वास्तविकतेला न स्वीकारता कल्पित गोष्टीच वास्तविकता असल्याचा भास करीत असतो. Congress-Election2024-Vidarbha भ्रम म्हणजे असा विश्वास आहे, जो स्पष्टपणे खोटा समज असतो. अशा भ्रामक अवस्थेत असलेली व्यक्ती वास्तवाशी संघर्ष करत, घटनांचा आणि वास्तविकतेला चुकीच्या अर्थाने घेऊन तेच कसे योग्य आहे, हे पटवून देण्यात आपली शक्ती खर्च करीत असते; सोबतच आपला समजदेखील दृढ करून घेत असतो. अशा मानसिक स्थितीत असलेल्या स्थितीला वैद्यकीय भाषेत ‘स्किझोफ्रेनिया' असे म्हणतात. Congress-Election2024-Vidarbha असाच ‘स्किझोफ्रेनिया' अर्थात भ्रमाचा एक आजार सध्याच्या राज्यातील महाविकास आघाडीच्या नेत्यांना आणि देशातील भारतीय राष्ट्रीय विकासात्मक समावेशक आघाडीच्या (आय.एन.डी.आय.ए.) नेत्यांना झालेला दिसतो. २८ दल, पक्षांनी मिळून बनलेल्या या आघाडीतील काँग्रेस सोडून अन्य दल जागा लढत आहेत २०, ३० आणि भास होत आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बलाढ्य किल्ल्याला सुरुंग लावण्याचा. Congress-Election2024-Vidarbha यांना अचानक हुकूमशाही आल्याचाही भास होत आहे.
 
 
 
Congress-Election2024-Vidarbha
 
 
अचानक बेरोजगारी वाढल्याचाही भास होत आहे, यांना अचानक देशाचा जीडीपी खाली आल्याचाही भास होत आहे, यांना अचानक उद्योगपतींना लाभ दिला जात असल्याचाही भास होऊ लागला आहे, यांना अचानक गरिबी वाढल्याचाही वास येऊ लागला आहे, यांना अचानक शेतकरी आत्महत्या वाढल्याचाही भास होत आहे, यांना विकासाचाही साक्षात्कार आता होऊ लागला आहे, महिला सुरक्षेची चिंता वाटू लागली आहे. अशा सर्व कल्पित कथांच्या नंदनवनात राहून, मोदींना आव्हान देण्याच्या कल्पनाविश्वात वावरून, आता चमत्कार घडणार असल्याच्या कपोलकल्पित गोष्टी सांगू लागले आहेत. Congress-Election2024-Vidarbha अशा या भ्रामक आजार झालेली ही लोकं जर ४ जूननंतर भानावर आली तर ठीक अन्यथा यांच्या आजारपणावर कुठल्याही उपचाराचे अजून संशोधन झालेले नाही. १८ व्या लोकसभेचा बिगुल वाजला आणि पहिल्या टप्प्यातील २१ राज्यांमध्ये १०२ जागांवर मतदान झाले. या पहिल्या टप्प्यात २१ राज्यांत महाराष्ट्राचाही समावेश होता आणि १०२ जागांमध्ये पूर्व विदर्भातील ५ जागांचा समावेश होता. या पाचही जागांवर भाजपा विरुद्ध काँग्रेस असा थेट सामना आहे. यात उद्धव ठाकरे गट आणि शरद पवार गट हे पत्त्याला कुठेही नाही.
 
 
 
 
Congress-Election2024-Vidarbha मात्र, पश्चिम विदर्भातील पाचपैकी बुलढाणा आणि यवतमाळ-वाशीम या दोन जागांवर उबाठा तर वर्धा येथे शरद पवार गटाचा उमेदवार आहे. अर्थात विदर्भातील तीन चतुर्थांश जागा या काँग्रेस पक्षाकडे आहे. मुळात भाजपासोबत युती असताना बुलढाणा, अमरावती, रामटेक आणि यवतमाळ-वाशीम हे चार मतदारसंघ विनाअट शिवसेनेकडे असायचे. आता यावेळी महाविकास आघाडीसोबत गेल्यावर जागा वाटप निम्म्यावर आले. विदर्भातील १० जागांपैकी केवळ दोन जागा उद्धव ठाकरे गटाच्या वाट्याला आल्या आहेत. Congress-Election2024-Vidarbha मागील २०१९ च्या निवडणुकीत भाजपाने २३ जागा शिवसेनेसाठी सोडल्या होत्या. यावेळी महाविकास आघाडीसोबत उद्धव ठाकरे २१ जागा लढवत आहेत. अर्थात मागील वेळेपेक्षा दोन जागा कमी. मग त्या दोन जागा म्हणजेच रामटेक आणि अमरावती. या काँग्रेसने हिसकावून घेतलेल्या दोन जागाच असाव्यात. Congress-Election2024-Vidarbha बरं, या दोन सोडल्या तर त्या बदल्यात दुसऱ्या दोन घेतल्या म्हणावं तर तशीही परिस्थिती नाही. कारण मागील वेळी लढविलेल्या जागांपेक्षा यावेळी २ जागा कमी आहेत. याचा अर्थ असा की, विदर्भात संघटनात्मक बळ नसताना, केवळ भाजपाच्या जिवावर विदर्भात आपली पाळंमुळं रोवण्याचं काम शिवसेनेने भाजपाला ब्लॅकमेल करून आजवर केले.
 
 
 
 
भाजपाच्या वटवृक्षावर यांची वेल वाढली आणि विदर्भात, मुंबईबाहेर आपलं अस्तित्व निर्माण केलं. अन्यथा मुंबईबाहेर ओळख नसलेल्या शिवसेनेला विदर्भात कुठला आला जनाधार? पण युतीत भाजपाच्या जनाधारावर आपली राजकीय पोळी शेकून घेण्याचं काम ३० वर्षे सातत्याने केले गेले आणि हेच लोकं भाजपा आमच्या जिवावर वाढल्याचा डांगोरा पिटतात. Congress-Election2024-Vidarbha हा यातला सर्वात गमतीशीर भाग आहे. शिवसेनेने २०१९ ला २३ जागा लढवून १८ जागांवर विजय मिळविला होता. यावेळी उद्धव ठाकरे २१ जागा लढवत असले तरी ४ जागा निवडून येण्याची शक्यता नाही आणि हे अमेठी, रायबरेली आणि वाराणसीच्या जागांसाठी सल्ले देताना दिसत आहेत. गद्दारांना गाडू-पाडूची भाषा करणारे, राजीनामा द्या आणि निवडणूक लढवा, असे एकनाथ शिंदेंना आव्हानांवर आव्हानं देणारे, ‘तुम्ही वरळीत या नाही तर मी ठाण्यात येतो,' ची भाषा करणारे ठाकरे पितापुत्र रणांगणातून पाय लावून पळाले आहेत. Congress-Election2024-Vidarbha खरे मर्द असते तर, ‘तुम लढो हम कपडे संभालते' म्हणत वाघाच्या तोंडी सामान्य कार्यकर्त्याला न देता, शिंदेंच्या पुत्राविरोधात ठाकरेंचा पुत्र स्वतः दोन हात करायला उतरला असता. मात्र, यांच्या तोंडाला सोडलं तर कुठेच जोर नाही, ही वास्तविकता आहे आणि ती अवघ्या महाराष्ट्राला कळून चुकली आहे. वरून काँग्रेसची यंत्रणा विस्कळीत झाली आहे.
 
 
 
Congress-Election2024-Vidarbha गांधी मैदानात असतील तरच काँग्रेसला चालना मिळेल... असा सल्ला हे लोकं स्वतः नेस्तनाबूत झालेल्या संघटनेचे रणछोडदास लोकं देऊ लागले आहेत. बरं, यात पुन्हा एक जोक असा की, काँग्रेसने उत्तरप्रदेशात आठ-नऊ जागांवर मजल मारली तर मोदींचा रथ दिल्लीच्या सीमेवरच अडखळेल. वाराणसीतून प्रियांका वढेरा निवडणूक लढणार, असे नुसते जाहीर जरी केले तर मोदींचे पाय लटपटतील, अशा या कल्पनाविश्वात वावरण्यालाच ‘भ्रामक अवस्था' असे म्हणतात आणि अशी अवस्था फार गंभीर अशा आजाराचे लक्षण आहे. एखाद्या व्यक्तीची अशी परिस्थिती चिंताजनकच म्हणावी लागेल. Congress-Election2024-Vidarbha एका गोष्टीचं आश्चर्य आहे, स्वतःचा पक्ष हा पक्षदेखील राहिलेला नसून निवडणुकीपुरतं नाव आणि चिन्ह मिळालेला एक गट आहे. तो इनमीन २१ जागांवर निवडणूक लढवणार. त्यात येणार किती तर शून्य... महाराष्ट्रातल्या ४८ जागांपैकी यांच्या किती येणार तर याचा दावा हे लोक कधीही करणार नाही. अर्थात आत्मविश्वासच नाही. पण भाजपा १५० पार जाणार नसल्याचा दावा ते मोठ्या आत्मविश्वासानं करताना दिसतात. उद्धव ठाकरे तर, भाजपाचे देशात फक्त ४८ खासदार निवडून येण्याचा दावा करून मोकळे झालेत. Congress-Election2024-Vidarbha अशा मानसिक आजारपणाच्या अवस्थेतून जात असलेल्या या लोकांसाठी केवळ आपण सदिच्छा तेवढी व्यक्त करू शकतो, ‘गेट वेल सून...!'
 
 
९२७०३३३८८६