येत्या सत्रात पहिल्याच दिवशी मिळणार पाठ्यपुस्तके

    दिनांक :19-Apr-2024
Total Views |
गोंदिया, 
Educational News : शासनाच्या सर्व शिक्षा अभियानांतर्गत इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके देण्यात येतात. शैक्षणिक वर्ष 2024-25 करिता पंचायत समिती स्तरावरून करण्यात आलेल्या मागणीनुसार बालभारती पाठ्यपुस्तक मंडळाकडे ई-बालभारती पोर्टलवर 1 लाखांवर पुस्तकांच्या संचाची मागणी नोंदविली आहे. पुढील शैक्षणिक सत्रात शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांच्या हातात पुस्तके देण्याचे शिक्षण विभागाने नियोजन सुरू केले आहे.
 

EDUCATION 
 
 
 
 गोंदियात सरासरी 65 टक्के मतदान जिल्हा परिषद, नगरपालिका, अंशतः अनुदानित, अनुदानित शाळेत इयत्ता पहिली ते आठवीत शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके देण्यात येतात. महाराष्ट्र शिक्षण परिषदेच्या मार्गदर्शक सूचनेनुसार पुस्तकांची मागणी नोंदविण्यात आली आहे. पुस्तके एकात्मिक स्वरूपाची असून, मराठी, इंग्रजी, हिंदी व उर्दू माध्यमांचा यात समावेश आहे. मे महिन्याच्या मध्यान्हपर्यंत पुस्तकांचा पुरवठा होणार असून, बालभारती डेपोतून पाठ्यपुस्तके पंचायत समितीकडे येणार आहे. पुढे शिक्षण विभागाला मिळणार्‍या सुचनेप्रमाणे पाठ्यपुस्तके शाळास्तरावर पोहोचविण्यात येणार आहेत. त्यामुळे यावर्षी पहिली ते इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी नवेकोरे पुस्तक मिळणार आहे. एकात्मिक पुस्तकांमुळे ओझे कमी गेल्या वर्षापासून विद्यार्थ्यांच्या हातात एकात्मिक पुस्तके देण्यात येत आहेत. यंदाही या पुस्तकांची आकर्षक छपाई करण्यात येत आहे. पाठ्यपुस्तकाच्या शेवटी कोरी पाने देण्यात आली आहेत. अभ्यास करताना विद्यार्थ्यांना पुस्तकातील कोर्‍या पानांवर नोट्स काढण्याची सुविधा राहणार आहे.
 
 
वाचनाची लागणार गोडी
 
 
एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये, शाळेतील विद्यार्थ्यांच्या गळतीचे प्रमाण शून्यावर आणण्यासाठी समग्र अभियानांतर्गत विविध उपक्रम राबविण्यात येतात. पुस्तकांमुळे विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. या पुस्तकांमुळे विद्यार्थ्यांना शाळेबाबत आवड निर्माण होईल.