निवडणूक आयोगाची सचिन सावंत यांना नोटीस

२२ रोजी सुनावणीस हजर राहण्याचे आदेश

    दिनांक :19-Apr-2024
Total Views |
मुंबई, 
Election Commission-Sachin Sawant : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासंदर्भात केलेल्या आरोपावरून निवडणूक आयोगाने काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांना शुक्रवारी नोटीस बजावली आहे. त्यांना २२ एप्रिल रोजी सुनावणीस प्रत्यक्ष हजर राहून बाजू मांडण्याचा आदेश नोटीसमधून देण्यात आला आहे.
 
 
sanjay savant
 
 
मुख्यमंत्री शिंदे शासकीय वर्षा बंगल्यावर निवडणुकासंदर्भात बैठका घेत असल्याचा आरोप सावंत यांनी केला होता. हा प्रकार आचार संहितेचे उल्लंघन असून, शासकीय बंगला प्रचाराचे केंद्र बनला असल्याची टीका त्यांनी केली होती. त्यांनी शिंदे यांच्याबाबत अपशब्दांचा वापर केला होता. यासंदर्भात शिवसेनेकडून आयोगाकडे सावंत यांची तक्रार करण्यात आली होती. याची दखल घेत आयोगाने त्यांना नोटीस बजावली आहे.
 
 
२२ एप्रिल रोजी आयोगाच्या कार्यालयात उपस्थित राहण्याचा निर्देश त्यांना देण्यात आला आहे तसेच सावंत यांनीही वर्षा बंगल्यावरील बैठकांचा मुद्दा उपस्थित करीत आयोगाकडे तक्रार केली आहे. त्यांच्या तक्रारीची दखल घेत अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावणार असल्याची माहिती निवडणूक आयोगाचे मुख्याधिकारी एस. चोकलिंगमय यांनी दिली आहे.