लोकशाहीचा धागा हो...

Election first phase-Nagpur ईव्हीएम ही निर्दोष व्यवस्था घड्याळाचे काटे मागे

    दिनांक :19-Apr-2024
Total Views |
अग्रलेख
 
Election first phase-Nagpur आपण राजा आहोत या भावनेचा अभिमान बाळगण्याची आणि बोटावरील एका निळ्या खुणेची ताकद दाखवून देण्याची संधी लोकशाहीतील प्रत्येक नागरिकास मिळते; तो सोन्याचा दिवस आज दाखल झाला आहे. भारताच्या लोकशाहीला बळ देणारा हा एक महत्त्वपूर्ण आणि अनमोल क्षण आहे. Election first phase-Nagpur  जवळपास ९७ कोटी मतदार, साडेदहा लाख मतदान केंद्रे आणि सुमारे दीड कोटी निवडणूक कर्मचारी अशा जय्यत तयारीनिशी लोकसभेच्या निवडणूक प्रक्रियेसाठी सज्ज असलेले मतदानपर्व आज सुरू होत आहे. Election first phase-Nagpur १८ व्या लोकसभेसाठी देशभरातील ५४३ लोकसभा मतदारसंघांत सात टप्प्यांमध्ये पार पडणाऱ्या मतदानाच्या प्रक्रियेची पहिली मुहूर्तघटिका समीप आली असून देशातील विविध २१ राज्ये व केंद्रशासित प्रदेशांतील १०२ मतदारसंघांतील सुमारे साडेसोळा कोटी मतदार आज सुमारे १.८६ लाख मतदान केंद्रांवर मतदान करतील. निवडणूक ही भारताच्या गौरवास्पद लोकशाहीची अभिव्यक्ती आहे. निवडणूक आयोगाच्या लाखो कर्मचाऱ्यांनी गेल्या दोन वर्षांपासून या निवडणुकीची पूर्वतयारी सुरू केली होती. Election first phase-Nagpur हा हक्क सुलभतेने बजावण्याचे समाधान मिळावे याकरिता सर्व मतदान केंद्रांवर आवश्यक त्या सुविधाही आयोगाने उपलब्ध करून दिल्या आहेत.
 
 
 
‘मतदार राजा' म्हणून संविधानाने नागरिकांस बहाल केलेल्या या सन्मानाचा प्रामाणिक आदर करणे प्रगल्भ लोकशाहीचा प्रगल्भ नागरिक या नात्याने योग्य व्यक्तीस संसदेत आपले प्रतिनिधित्व करण्यासाठी निवडून देण्याची मोठी जबाबदारी प्रत्येक सुजाण नागरिकाची आहे. Election first phase-Nagpur गेल्या काही महिन्यांत राजकीय प्रचाराची रणधुमाळी आपण अनुभवली. आरोप-प्रत्यारोपांच्या गदारोळात, संभ्रम माजविण्याच्या किंवा समज-गैरसमज पसरविण्याच्या राजकारणातील अनेक खेळी पाहावयास मिळाल्या. निवडणुका हे एक युद्ध असते. महाभारतकालातील युद्धातही असा संभ्रम पसरविण्याची युद्धनीती वापरली गेली होती आणि ‘नरो वा कुंजरो वा' नीतीमुळे एका निर्णायक क्षणाचा नेमका वापर करून शत्रुपक्षाचे डावपेच हाणून पाडण्याचा प्रयोग झाला होता. युद्धनीतीमध्ये असे डावपेच आणि कुरघोडीचे प्रयोग होत असले, तरी प्रतिस्पर्धी म्हणून मैदानात समोरासमोर असलेल्यांवर त्याच्या होणाऱ्या बऱ्यावाईट परिणामांची चिंता न करता, खरा सैनिक लढाई करतच असतो. Election first phase-Nagpur निवडणुकीच्या निमित्ताने सुरू झालेले हे एक रणमैदान गाजविण्याची जबाबदारी लोकशाहीचा सैनिक या नात्याने मतदारावर असल्याने, परस्पर पक्षांतील अशा रणनीतीचा परिणाम न होऊ देता, देशाच्या गौरवास्पद लोकशाही अभिव्यक्तीचा हा उत्सव न्याय्य रीतीने पार पाडण्याचा पहिला मुहूर्त आज साजरा करावयाचा आहे. मतदान हा अधिकार आहेच; पण त्याहूनही महत्त्वाचे म्हणजे, ती जबाबदारी आहे.
 
 
 
एखादा अधिकार पार पाडताना ज्या उत्साहाने प्रत्येक जण पुढे सरसावतो, त्याच उत्साहाने जबाबदारी पार पाडण्याची जाणीव जागी असणे महत्त्वाचे असते. आजपासून पुढच्या सात टप्प्यांतील मतदानाच्या प्रत्येक तारखेस प्रत्येक मतदारास ही जाणीव जागी ठेवावी लागेल. Election first phase-Nagpur योग्य त्या प्रतिनिधीची विवेकबुद्धीने निवड करण्याचा हक्क बजावणे हाच मतदानाचा हेतू असल्याने, मतदान यंत्रावर उपलब्ध असूनही ‘नोटा' नावाच्या पर्यायाचा वापर न करता मतदान होणे, हा लोकशाहीने दिलेल्या हक्काचा खरा आदर ठरतो. मतदानाच्या निमित्ताने मिळणाऱ्या सुटीचा उपभोग घेऊन वैयक्तिक qकवा कौटुंबिक आनंदासाठी मतदानाकडे पाठ फिरविण्याची मानसिकता अनेकदा उघड झाली आहे. असा सुटीचा आनंद उपभोगण्याची ही एकमेव संधी नाही तर जबाबदारी पार पाडणे सुलभ व्हावे याकरिता मिळालेली सवलत आहे, याची जाणीव असणे महत्त्वाचे असते. Election first phase-Nagpur आपल्या पसंतीचा उमेदवार नसल्यास अन्य सर्व उमेदवारांस नाकारण्याचा हक्क लोकशाहीने मान्य केल्याने, मतदान यंत्रावर ‘यापैकी कोणीही नाही' (नोटा) हा पर्याय निवडण्याचे स्वातंत्र्य मतदारास प्राप्त झाले आहे. मात्र, हा पर्याय निवडल्यानंतरही कोणता तरी उमेदवार विजयी होणारच असतो, हे लक्षात घेतल्यास ‘नोटा' या पर्यायाचा स्वीकार करून आपल्या मताचे मोल आपणच कमी करत नाही ना, याचा विचार मतदाराने करावा आणि मतदान करावे. Election first phase-Nagpur लोकशाहीचा धागा ठरणाऱ्या मतदाराने सजग राहावे आणि लोकप्रतिनिधी निवडण्याकरिता मतदान करावे, यातच लोकशाहीचे हित आहे.
 
 
मतदारांनी मतदानाचाच पर्याय निवडावा यातच मतदानाच्या हक्काची जपणूक होत असल्याने, मतदानाचे कर्तव्य आणि जबाबदारी पार पाडण्याचे समाधानही त्यातून मिळत असते. आज पार पडणाऱ्या पहिल्या टप्प्यातील मतदानातून आठ केंद्रीय मंत्री, दोन माजी मुख्यमंत्री आणि एक माजी राज्यपाल मतदारांचा कौल आजमावणार आहेत. महाराष्ट्राच्या नागपूर मतदारसंघातून केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग विकास मंत्री नितीन गडकरी हे तिसऱ्यांदा निवडणूक लढवत आहेत. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत गडकरी यांना २.८४ लाखांच्या प्रचंड मताधिक्याने विजयी करून मतदारांनी त्यांच्यावर लोकप्रतिनिधित्वाची जबाबदारी टाकली होती. Election first phase-Nagpur २०१९ मध्येही गडकरी आणि काँग्रेसचे नाना पटोले यांच्यातील लढतीत मतदारांनी पुन्हा गडकरी यांनाच कौल दिला होता. गेल्या १० वर्षांत केंद्रीय मंत्री आणि नागपूरचे खासदार म्हणून बजावलेल्या लोकप्रतिनिधित्वाच्या भूमिकेची शिदोरी घेऊन पुन्हा एकदा नितीन गडकरी नागपूरमधून मतदारांचा कौल आजमावत आहेत. त्यांच्या विरोधात काँग्रेसने विद्यमान आमदार विकास ठाकरे यांना उमेदवारी दिली आहे. महाराष्ट्रातील नागपूरसह रामटेक, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा-गोंदिया या पूर्व विदर्भातील पाच मतदारसंघांत पहिल्या टप्प्यातील निवडणुकासाठी आज होणाऱ्या मतदानातून भाजपप्रणीत महायुती आणि विरोधकांची महाविकास आघाडी असा सरळ सामना होणार असून भाजपाने २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत जिंकलेल्या चार जागा टिकवून पाचव्या जागेसाठीची चुरशीची लढाई जिंकण्याचे आव्हान भाजपासमोर आहे.
 
 
Election first phase-Nagpur चंद्रपूरमध्ये राज्याचे वन आणि सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि महाविकास आघाडीच्या प्रतिभा धानोरकर यांच्यात लढत असून गडचिरोलीत भाजपाचे विद्यमान खासदार अशोक नेते यांच्या विरोधात काँग्रेसचे डॉ. नामदेव किरसान हे आहेत, तर भंडारा-गोंदिया मतदारसंघात भाजपाचे विद्यमान खासदार सुनील मेंढे व काँग्रेसचे डॉ. प्रशांत पडोळे यांच्यातील चुरस लक्षणीय ठरणार आहे. गेल्या काही दिवसांत मतदान यंत्रांच्या वापराविरुद्धचे आवाज पुन्हा एकदा तीव्र झाले. पराभवाची चाहूल लागली की मतदान यंत्रांवर खापर फोडण्याचा कांगावा सुरू होतो, असा आरोप सत्ताधारी पक्षाकडून नेहमीच केला जातो. Election first phase-Nagpur मतदान यंत्रे ही परिपूर्ण मतदान व्यवस्था असून ती अधिकाधिक निर्दोष असावी याकरिता निवडणूक यंत्रणा काटेकोरपणे काळजी घेत असते. मतदान यंत्रांमध्ये फेरफार होत असल्याचा आरोप आयोगाने वारंवार फेटाळूनही लावला आहे. तरीही मतदान यंत्रांच्या वापराविरुद्धच्या याचिका थेट न्यायालयाचे दरवाजे ठोठावू लागल्याने, न्यायालयानेही त्यावर नापसंती व्यक्त केली आहे.
 
 
मतदान यंत्रांचा वापर थांबवून पुन्हा एकदा मतपेट्यांच्या जुन्या मतदान प्रक्रियेकडे जाणे म्हणजे घड्याळाचे काटे मागे फिरविणे होईल, असे स्पष्ट मत न्यायालयानेही नोंदविले. Election first phase-Nagpur जर्मनीसारख्या सहा कोटी लोकसंख्या असलेल्या देशातील निवडणूक प्रक्रिया आणि भारतासारख्या १४५ कोटी लोकसंख्या असलेल्या देशातील निवडणूक प्रक्रिया यांची तुलना करून पुन्हा एकदा मतपेट्यांचा आग्रह धरणे हास्यास्पद असल्याचा सूरही या सुनावणीत उमटला, तेव्हा मतपेट्यांच्या काळात होणाऱ्या गैरव्यवहारांचे, मतपेट्या पळविण्याचे आणि बनावट मतदानाचे भूतकाळातील अनेक दाखले मतदारांस आठवले असतील. मतदान यंत्रे आणि मतपेट्या हा वाद अलिकडे जवळपास प्रत्येक निवडणुकीच्या काळात उफाळू लागला असला, तरी मतदान यंत्रे (ईव्हीएम) ही आजची सर्वात निर्दोष व्यवस्था असल्याचा निर्वाळा वारंवार दिला गेला आहे. Election first phase-Nagpur त्यामध्ये दोष असल्याचे दाखवून देण्याचे आव्हान निवडणूक आयोगाने याआधीही