मित्र मंडळ तर्फे सीताबर्डी येथे श्री रामाची भव्य महाआरती

19 Apr 2024 12:49:41
 
am 
 
 नागपूर, 
Mitra Mandal राम नवमीच्या पावन पर्वावर सीताबर्डी महाजन मार्केट दुकानदार संघ व सीताबर्डी मित्रमंडळातर्फे सीताबर्डी मेन रोड युको बँक जवळ श्री रामाची भव्य महाआरती आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते, याप्रसंगी प्रमुख पाहुणे रा. स्व . संघाचे धरमपेठ भाग संघचालक  श्याम पत्तरकिने, सीताबर्डी प्रभाग १५चे माजी नगरसेवक  संजय  बंगाले ,माजी नगरसेविका उज्वला शर्मा, प्रसिद्ध उद्योजिका मनीषा महाजन यांच्या हस्ते श्रीरामाची महाआरती करण्यात आली व महाप्रसादाचे वितरण राम भक्तांना करण्यात आले, विशेष म्हणजे शत प्रतिशत मतदान व्हावं या उद्देशाने मतदान जनजागृती बॅनर सुद्धा येथे लावण्यात आले होते. याप्रसंगी महाजन मार्केट दुकानदार संघाचे सर्व गणमान्य व्यापारी बंधू तसेच सीताबर्डी मित्र मंडळाचे सर्व , सन्माननीय सदस्यांनी सहभाग घेऊन हजारोच्या संख्येने आलेले राम भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.
सौजन्य:अमोल तपासे,संपर्क मित्र  
Powered By Sangraha 9.0