अनावश्यक असल्यास दुबईचा प्रवास टाळा

    दिनांक :19-Apr-2024
Total Views |
- भारतीय दूतावासाचा भारतीय नागरिकांना सल्ला
 
अबूधाबी, 
या आठवड्यात Heavy rain in UAE यूएईमध्ये जोरदार पाऊस होऊन भीषण पूरस्थिती निर्माण झाली. अबूधाबीमधील भारतीय दूतावासाने शुक्रवारी परिस्थिती सामान्य होईपर्यंत अनावश्यक प्रवास टाळण्याचा किंवा आधीच नियोजित प्रवासाचे वेळापत्रक बदलण्याचा सल्ला दिला. यूएईमध्ये या आठवड्यात झालेल्या विक‘मी पावसानंतर दुबई आणि परिसरात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली असून, देश त्यातून सावरण्याचा प्रयत्न करीत आहे.
 
 
UAE Havy rain
 
Heavy rain in UAE : भारतीय दूतावासाने म्हटले आहे की, यूएईचे अधिकारी परिस्थिती सामान्य करण्यासाठी चोवीस तास काम करीत आहेत. उड्डाणाची तारीख आणि वेळेबाबत विमान कंपन्यांकडून अंतिम खात्री केल्यानंतरच प्रवासी विमानतळावर जाऊ शकतात. या आठवड्याच्या सुरुवातीला यूएईमध्ये खराब हवामानामुळे उद्भवलेल्या समस्यांमुळे दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळाने येणार्‍या विमानांची सं‘या मर्यादित केली आहे.
 
 
आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी जगातील सर्वांत व्यस्त असलेले Heavy rain in UAE दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळ 24 तासांच्या आत पूर्ववत् होईल. दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर भारतीय नागरिकांना मदत करण्यासाठी, दुबईतील भारतीय वाणिज्य दूतावासाने 17 एप्रिलपासून आपत्कालीन हेल्पलाईन क‘मांक सुरू केले आहेत.