इस्रायलचा इराणसह इराक, सीरियावर हल्ला

    दिनांक :19-Apr-2024
Total Views |
- सीरियन सैन्याच्या तळांना लक्ष्य
 
नवी दिल्ली, 
Israel attacks : 13 एप्रिलच्या मध्यरात्री इराणने इस्रायलवर क्षेपणास्त्राने हल्ला केला होता. तेव्हापासूनच इस्रायल या हल्ल्याचा वचपा काढेल, असा अंदाज होता. हा अंदाज खरा ठरला आणि एका आठवड्यानंतर शुक्रवारी इस्रायलने इराणवर हल्ला केला. परंतु, हा हल्ला केवळ इराणवरच नव्हता, तर इस्रायलने आणखी दोन देशांवर हल्ला केला. अहवालानुसार, इस्रायलने इराण व्यतिरिक्तइराक आणि सीरियावर हवाई हल्ला सुरू केला. इराकची राजधानी बगदादमधील एका इमारतीला लक्ष्य करून एअर स्ट्राईक करण्यात आले. या इमारतीत एक उच्चस्तरीय बैठक आयोजित करण्यात आली होती, ज्यात इराण समर्थित अनेक समूह आणि इस्लामिक क्रांतिकारक गार्ड कॉर्प्सचे (आयआरजीसी) सदस्य उपस्थित होते.
 
 
Israel attacks
 
Israel attacks : सीरियाच्या अनेक अहवालात असे म्हटले आहे की, दक्षिण सीरिया आणि दारा प्रांतांमधील इस्रायली हवाई हल्ल्यांमध्ये सीरियन सैन्याच्या तळांना लक्ष्य केले गेले आहे. तथापि, इराणने इस्रायली हल्ला नाकारला आहे. त्याच वेळी इस्रायलने अद्याप या हल्ल्यांची कोणतीही अधिकृत पुष्टी केलेली नाही. इराण आणि सीरिया हे जवळचे भागीदार आहेत. सीरिया सहसा इराणचे ‘जवळचे राष्ट्र’ म्हणून वर्णन करतो. सीरियातील गृहयुद्धात इराणने सीरियन सरकारला जोरदार पाठिंबा दर्शविला. इराण त्याच्या सहयोगी सीरियाला सर्व प्रकारची मदत पुरवितो. या दोघांमध्ये आणखी एक सामान्य दुवा आहे आणि तो अमेरिका आहे. दोन्ही देशांचे संबंध अमेरिकेशी चांगले नाहीत आणि अमेरिकेला या दोन देशांचे संबंध आवडत नाहीत. त्याचप्रमाणे इराण आणि इराकमधील मैत्रीपूर्ण संबंध कोणापासून लपलेले नाही. सीरिया आणि इराक हे देखील मध्यपूर्वेतील इराणचे सर्वांत मोठे सहयोगी आहेत.
इस्रायलवरील हल्ल्याचे कारण
1 एप्रिल रोजी सीरियामधील इराणच्या वाणिज्य दूतावासावर हल्ला झाला. या हल्ल्यात इराणने त्याच्या सर्वोच्च कमांडरसह अनेक लष्करी अधिकार्‍यांच्या मृत्यूचा दावा केला. या हल्ल्यासाठी इराणने थेट इस्रायलचा दोष दिला. याच हल्ल्याचा सूड घेण्यासाठी इराणने Israel attacks इस्रायलवर हल्ला केला आणि त्याला ‘ऑपरेशन ट्रू प्रॉमिस’ हे नाव दिले.