कपाळावर मुंडावळ अन् वऱ्हाड घेऊन नवरदेव पोहचला मतदानाला

    दिनांक :19-Apr-2024
Total Views |
नागपूर,
Lok Sabha Elections 2024 : महाराष्ट्रातही लोकसभेच्या पहिल्या टप्प्यातील मतदान विदर्भात आज मतदान होत आहे. सकाळपासूनच तरुण, वृद्ध, मध्यमवयीन नागरिक, मतदानासाठी उत्साहाने बाहेर पडले आहेत.
 

NAG NAVRDEV VOTING 
 
 
 
एवढंच नव्हे तर दिव्यांग नागरिकही त्यांचे मतदानाचं कर्तव्य बजवाताना दिसत आहेत. मात्र नागपूर विधानसभेतील वंजारी नगरमधील एका तरुण मतदाराने सर्वांचं लक्ष वेधून घेतले. Lok Sabha Elections 2024 अंगात पिवळ्या रंगाची शेरवानी, कपाळावर मुंडावळ आणि सोबत वऱ्हाड घेऊन चक्क मतदान करायला पोहचले होते. यावेळी सर्वांच्या नजरा त्याच्याकडेच वळल्या. चतुर्भुज होण्यापूर्वी धनंजय सुभाष ठकरे या तरुणाने प्रथम आपले मतदानाचे कर्तव्य बजावले.
 
लोकशाहीच्या बळकट व्हावी व योग्य लोकप्रतिनिधी निवडण्यासाठी आपण मतदान केल असे धनंजयने आवर्जून सांगितल. जास्तीत जास्त लोकांनी मतदानाचा हक्क बजावावा असं आवाहनही त्याने नागरिकांना केले. Lok Sabha Elections 2024 नवरदेवाचा हा उत्साह पाहून कुकडे ले आऊट येथील रावसाहेब ठवरे हायस्‍कुलमध्ये जमलेले मतदारही कौतुक करत होते. नागपूर लोकसभेत भाजपाचे उमेदवार नितीन गडकरी आणि काँग्रेसचे विकास ठाकरे समोरासमोर आहेत....