काँग्रेसचे विशाल पाटील सांगलीतून माघार घेणार

मविआच्या बैठकीनंतर संजय राऊतांची माहिती

    दिनांक :19-Apr-2024
Total Views |
सांगली, 
Lok Sabha Elections 2024 : महाविकास आघाडीतील ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रहार पाटील हेच सांगलीचे उमेदवार आहेत. गुरुवारी झालेल्या बैठकीनंतर काँग्रेसचे विशाल पाटील यांची समजूत काढण्यात आली असून, ते उमेदवारी अर्ज परत घेणार असल्याची माहिती खासदार संजय राऊत यांनी दिली.
 
 

vishal patil
 
 
 
चंद्रहार पाटील उमेदवारी अर्ज दाखल करणार असून, यानिमित्ताने राऊत सांगलीत दाखल झाले असता माध्यमांसोबत बोलत होते. ते म्हणाले, काँग्रसच्या नाराज नेत्यांसोबत आमची चर्चा झाली. यावेळी मतभेद दूर झाले आहे. ठाकरे गटाच्या उमेदवाराला काँग्रेसने पाठिंबा दिला असून, ते प्रचारात सहभागी होणार आहे. जे आघाडीचे नेते आहेत, ते सगळे सोबत आहे. सांगलीची जागा आघाडी शंभर टक्के जिंकणार आहे. विशाल पाटील आमच्या कुटुंबातील आहे. त्यांनी उमेदवारी अर्ज भरला, पण आता ते माघार घेतील. दरम्यान, पाटील लोकसभा निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहेत. सांगलीची जागा काँग्रेसला मिळावी यासाठी जिल्हा काँग्रेस आग्रही होती. यातून शिवसेना ठाकरे गटावर काँग्रेसकडून नाराजी देखील व्यक्त करण्यात आली होती. राऊत यांच्या मागील दौर्यावेळी आणि महाविकास आघाडीच्या मेळाव्यावर काँग्रेस नेत्यांनी बहिष्कार देखील घातला होता.