आधी लगीन लोकशाहीचं! मग स्वतःच...

बोहल्यावर चढण्याआधी नवरदेवाने बजावला मतदानाचा हक्क

    दिनांक :19-Apr-2024
Total Views |
vbgfy6
तभा वृत्तसेवा
चंद्रपूर, 19 एप्रिल
Navaradeva right to vote लोकसभेच्या चंद्रपूर-वणी-आर्णी मतदार संघात सकाळी 11 वाजतापर्यंत 18.94 टक्के मतदान झाले. गणेश बाळकृष्ण पाटील या नवरदेवाने बोहल्यावर चढण्याआधी मतदानाचा हक्क बजावला. जिल्ह्यात 2 हजार 118 मतदान केंद्रावर सकाळी 7 वाजतापासून मतदान प्रक्रिया सुरू झाली. जिल्ह्यातील धानोरा पीपरी येथील नवरदेव गणेश बाळकृष्ण पाटील यांनी वरातीपूर्वी पीपरी येथील मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला. सकाळी 11 वाजतापर्यंत राजुरा - 21.40 टक्के, बल्लारपूर - 20.10 टक्के, चंद्रपूर - 19.03 टक्के, वरोरा - 17.75टक्के, चिमूर - 21 टक्के, ब्रह्मपुरी - 21.98 टक्के, वणी, 19.96 टक्के, आर्णीत 15.50 टक्के मतदान झाले.