पवारांचे सीतामाईंच्या मूर्तीबाबतचे विधान ढोंगीपणाचे

    दिनांक :19-Apr-2024
Total Views |
- प्रवीण दरेकर यांची टीका

मुंबई, 
अयोध्येतील मंदिरात बाल रूपातील रामलला विराजमान आहेत. तेथे सीतामाईंची मूर्ती का नाही, अशी विचारणा करणारे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आपला ढोंगीपणा दाखवून दिला आहे, अशी टीका भाजपाचे विधान परिषदेतील गटनेते आमदार Praveen Darekar प्रवीण दरेकर यांनी शुक्रवारी केली. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रपरिषदेर दरेकर बोलत होते. दरेकर म्हणाले की, पवार मंदिरात जात नाही. आपण धार्मिक नाही, अशी शेखी मिरवत असता. धार्मिक नसलेल्या पवार यांना अयोध्येतील मंदिरात सीतेची मूर्ती का नाही, याची चिंता लागावी, हे आश्चर्यजनक आहे. प्रत्येक गोष्टीत राजकारण आणण्याचा स्वभाव असल्याने त्यांच्याकडून अशी विधाने केली जात आहेत. राम मंदिर निर्मितीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता प्रचंड वाढली आहे.
 
 
Praveen Darekar
 
हे पाहून हतबल झालेल्या पवारांनी अशा कुरापती काढणे सुरू केले आहे. आपल्या सुनेला बाहेरची म्हणून हिणवणार्‍या पवारांना सीतामाईंचा कळवळा येतो, यातून त्यांना आलेले नैराश्यच दिसत आहे. राम मंदिरातील मूर्ती बालरूपातील रामलला आहेत, हे माहीत नसल्याने पवारांनी अशी वक्तव्ये केली आहेत. रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातून उबाठा गटाने कितीही बढाया मारल्या तरी भाजपा महायुतीचे उमेदवार नारायण राणे प्रचंड मताधिक्याने निवडून येतील, असा विश्वास दरेकर यांनी व्यक्त केला. तर, राऊत यांनी 10 वर्षे खासदार असताना कोकणासाठी काय केले, याचा हिशेब द्यावा, अशा शब्दांत Praveen Darekar दरेकर यांनी विनायक राऊतांवर जोरदार हल्ला चढविला.
 
 
महायुतीत तीन मोठे पक्ष असल्याने जागावाटपाला थोडा वेळ लागणारच. प्रत्येकाला आपल्याला अधिक जागा मिळाव्या, असे वाटणे साहजिक आहे. आम्हा सर्वांचे लक्ष्य नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्याचे असल्याने जागावाटपाबाबत समाधानकारक तोडगा निघेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. माढा लोकसभा मतदार संघात कोणी कितीही दावे केले तरी महायुतीचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर लाखांच्या मताधिक्याने विजयी होतील, असा विश्वास Praveen Darekar दरेकर यांनी व्यक्त केला.