गोळीबाराच्या घटनेनंतर सलमान दुबईला रवाना

    दिनांक :19-Apr-2024
Total Views |
मुंबई,
Salman Khan गोळीबाराच्या घटनेनंतर सलमान खान दुबईला रवाना झाला आहे. या घटनेनंतर अभिनेता भारताबाहेर जाण्याची ही पहिलीच वेळ आहे. यादरम्यान, विमानतळावरून त्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे, जो व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये सलमान खान कडक सुरक्षा व्यवस्थेत दिसत होता.  फायरींगनंतर पहिल्यांदाच सलमान घराबाहेर, पुन्हा मिळाली धमकी !
 

Salman Khan 
 
अरे देवा...जेसीबीच्या साहाय्याने विमान उडले हवेत, बघा व्हिडिओ  सलमान खान शुक्रवारी मुंबई विमानतळावरून दुबईला निघताना विमानतळावर दिसला. तिथे एका कार्यक्रमात अभिनेता जाणार आहे. यावेळी त्याच्यासोबत बॉडीगार्ड शेराही दिसला. ब्लॅक टी-शर्ट आणि मॅचिंग पॅन्टमध्ये सलमान खान देखणा दिसत होता. सलमान कारमधून बाहेर आला तेव्हा त्याच्यासोबत सुरक्षा रक्षकांचा ताफा दिसला. वांद्रे येथील सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये रविवारी गोळीबार झाला होता. Salman Khan दोन अज्ञात व्यक्तींनी त्यांच्या घरावर गोळीबार केला होता. मात्र, या घटनेत जीवित वा वित्तहानी झाली नाही. या घटनेनंतर केवळ कुटुंबीयच नाही तर चाहतेही सलमानसाठी चिंतेत असल्याचे पाहायला मिळाले. मात्र, महाराष्ट्र सरकारने या घटनेनंतर संपूर्ण सलमानला कडेकोट सुरक्षा पुरवली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही सलमान खानला त्याच्या घरी भेटायला गेले होते. विजापूरमध्ये मतदानादरम्यान नक्षलवाद्यांचा बॉम्बस्फोट...
 
सलमान खानच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाल्यास, अभिनेत्याने अलीकडेच ईदच्या मुहूर्तावर त्याच्या पुढील प्रोजेक्टची घोषणा केली आहे. सलमान खान 2025 च्या ईदला सिकंदर हा चित्रपट घेऊन येत आहे. साजिद नाडियादवाला या चित्रपटाची निर्मिती करत आहेत.  T20 विश्वचषकात सर्वाधिक वेळा शून्यावर आऊट झालेले टॉप 5 खेळाडू