केजरीवालांविरूद्ध रचला जातोय् कट

    दिनांक :19-Apr-2024
Total Views |
- संजय सिंह यांचा आरोप
 
नवी दिल्ली, 
मद्य घोटाळ्यात तुरुंगात असलेले मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याविरुद्ध कट रचला जात आहे आणि तुरुंगात त्यांच्यासोबत काहीही होऊ शकते, असा आरोप आम आदमी पार्टीचे राज्यसभा सदस्य Sanjay Singh संजय सिंह यांनी शुक्रवारी केला. येथील पत्रपरिषदेत सिंह यांनी आरोप केला की, भाजपाची ‘मोडस ऑपरेंडी’ एखाद्याला ठार मारण्याच्या पातळीपर्यंत जाऊ शकतात. सिंह यांच्या आरोपावर भाजपाकडून कोणतीही प्रतिकि‘या आली नाही.
 
 
Sanjay Singh-Kejriwal
 
केजरीवाल यांच्या आजाराची खिल्ली उडविणार्‍या भाजपा नेत्यांवर Sanjay Singh संजय सिंह यांनी टीका केली आणि केजरीवाल यांच्याबद्दल दिशाभूल करणारी बातमी माध्यमांद्वारे पसरली जात असल्याचा आरोप केला. तुरुंंगातील नियमांमुळे एखाद्या कैद्याची आरोग्याशी संबंधित माहिती कोणाबरोबरही सामायिक केली गेली नाही, तर ईडीने गुरुवारी माध्यमात केजरीवालचा बनावट आहार चार्ट का जाहीर केला, असे सिंह यांनी विचारले. दिल्लीच्या कॅबिनेट मंत्री आतिशी यांनी गुरुवारी असा आरोप केला की, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ठार मारण्याचा कट होता.