उमेश कोल्हे यांचे बलिदान हिंदुत्वासाठी

-मविआच्या नेत्यांनी प्रकरण दाबले होते -नवनीत राणा झाल्या भावुक

    दिनांक :19-Apr-2024
Total Views |
तभा वृत्तसेवा
अमरावती, 
Umesh Kolhe-Navneet Rana : वैद्यकीय व्यवसायी उमेश कोल्हे हत्याकांड आज देखील अमरावती शहर आणि जिल्हावासी विसरू शकले नाही. त्यांनी हिंदुत्वासाठी बलिदान दिले. मविआच्या नेत्यांनी हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला होता, असे उद्गार भावुक झालेल्या नवनीत राणा यांनी काढले. यावेळी उमेश कोल्हे यांच्या पत्नी सविता कोल्हे उपस्थित होत्या.
 
 
SDKF
 
गुरुवारी रात्री गाडगेनगर येथील गाडगेबाबा मैदानात भजन गायक कन्हैया मित्तल आणि त्यांच्या चमुची संगीतमय भजन संध्या झाली. या कार्यक्रमात सविता कोल्हे यांनी सहभाग घेऊन सर्व मतदारांनी हिंदुत्वाचा वारसा जपणार्‍या नवनीत राणा यांना सर्वाधिक मतांनी निवडून देण्याचे आवाहन केले. यावेळी सभेत उपस्थित हजारो जनसमुदाय अत्यंत भावनिक झाला होता. सर्वप्रथम उमेश कोल्हे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. भाजप उमेदवार नवनीत राणा, आमदार रवी राणा, भाजप महिला आघाडीच्या नेत्या सुरेखा लुंगारे व इतर घटक पक्षाचे पदाधिकारी आणि प्रमुख कार्यकर्ता मंचावर उपस्थित होते. सर्वांनी आव्हान केले की, जागे व्हा आणि कोल्हे हत्याकांडाची पुनरावृत्ती टाळा. नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी सभागृहात आणि सडकीवर उतरुन कोल्हे हत्याकांडचा पर्दाफाश करण्यासाठी कसा पाठपुरावा केला, हे देखील या जाहीर सभेत व्हिडिओच्या माध्यमातून हजारो लोकांना दाखवले. हे सर्व पाहून लोक अत्यंत भावनिक झाले होते.
 
 
अमरावतीचे नाव उंचावले
 
 
गेल्या पाच वर्षात अमरावती लोकसभा मतदारसंघातील जनतेच्या निगडित प्रश्नांना लोकसभेत वाचा फोडली. सर्वांगीण विकासाकरिता नेहमीच प्रयत्न केले आहे. विमानतळासह अनेक प्रश्न मार्गी लागले आहे. मेगा टेक्स्टाईल पार्क होणार आहे. अनेक रेल्वे गाड्या सुरू झाल्या. निराधार, दिव्यांग व वयोवृद्ध नागरिकांचे मानधन बाराशे करण्यात यश मिळाले. श्रावणबाळ योजनेचे मानधन पंधराशे वरून तीन हजार करकरण्यासाठी पूर्ण प्रयत्न करणार असल्याचे सांगून भविष्यातही विकासलाच प्राधान्य देण्याची ग्वाही नवनीत राणा यांनी यावेळी दिली.