ज्येष्ठांंसह दिव्यांगांचे मतदान

हदगाव तालुक्यात 166 नोंद

    दिनांक :19-Apr-2024
Total Views |
तभा वृत्तसेवा
हदगाव,
Voting of persons with disabilities हदगाव तालुक्यात 166 ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग मतदारांची नोंद असून त्यांचे मतदान घरीच करण्यासाठी 20 व 21 एप्रिल रोजी पथक त्यांच्या घरी जाणार आहेत. हिंगोली लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 26 एप्रिल रोजी होणार आहे. हदगाव विधानसभा मतदारसंघात ज्येष्ठ मतदार व नवमतदारांना मतदान माहिती चिठ्ठी (पोलचिट) वाटपाचे काम बीएलओ मार्फत होत आहे.
 
 
Voting of persons with disabilities
 
85 वर्षे वयाच्यावर असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना पूर्वकल्पना दिली आहे. यापैकी काही मतदार हे होम व्होटिंग करणार आहेत. ज्यांनी बारा (ड) अर्ज भरून दिला आहे. यामध्ये 151 ज्येष्ठ नागरिक व 15 दिव्यांग आहेत. या एकूण 166 मतदारांनी घरी पोस्टल मतदान करण्याचा पर्याय स्वीकारला आहे. Voting of persons with disabilities त्यांच्या घरी मत नोंदवण्यासाठी 20 व 21 एप्रिल रोजी पथक येणार आहे. ज्यांचे मतदान 20 व 21 रोजी होणार नाही त्यांना 22 एप्रिल रोजी मतदान करता येईल, असे सहायक निवडणूक अधिकारी अविनाश कांबळे यांनी व पोस्टल बॅलेट पथक प्रमुख पल्लवी टेमकर यांनी सांगितले आहे.