‘तळे’गावात जन‘सागर’ लोटला

    दिनांक :19-Apr-2024
Total Views |
- जेवढे आत दुप्पट बाहेर
 
गोपाल चिकाटे
तळेगाव (शा.पंत), 
Wardha Lok Sabha : स्वातंत्र्यसमरासाठी थेट ओळखल्या जाणार्‍या तळेगाव श्यामजीपंत येथे 1973 मध्ये तत्कलीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांची सभा झाली होती. त्यानंतर पंतप्रधानपदावर असलेले नरेंद्र मोदी यांची सभा येथील चेतना ग्राऊंडवर झाली. या सभेची उत्कंठा लागुन होती. आज 19 रोजी दुपारी 12 वाजतापासुन जनता तळेगावात येऊ लागली. मोदींच्या सभेला जेवढे आत होते त्यापेक्षा दुप्पट बाहेर सभा ऐकण्यासाठी उभे होते. न भूतो न भविष्यती अशी सभा झाली. व्यवस्था आणि पोलिस बंदोबस्तही चोख होता. सभा यशस्वी झाल्याचा आनंद भाजपाच्या नेत्यांच्या चेहर्‍यावर झळकत होता.
 
 
wardha k
 
Wardha Lok Sabha : वर्धा लोकसभा मतदार संघाचे उमेदवार रामदास तडस व अमरावतीच्या नवनीत राणा यांच्या प्रचाराकरिता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा आयोजित करण्यात आली होती. गेल्या तीन चार दिवसापासून सभा यशस्वी होण्याकरिता प्रशासन कामाला लागले होते. भाजपाचे पदाधिकारी तळठोकून होते. आज सकाळी 12 वाजतापासून नागरिकांनी सभा स्थळी येण्याची सुरुवात केली होती. तळेगावच्या उड्डाण पुलापासून तर नांगलिया पेट्रोल पंपापर्यंत वाहनाच्या रांगाच रांगा लागून होत्या. पार्किंगमध्ये जागा कमी पडत असल्याने अनेकांच्या घरापुढे वाहने लावल्या गेली. सभा स्थळी महिला वर्गाचा मोठ्या प्रमाणात समावेश दिसत होता. तळेगावातील सर्व परिसर मोदी मय झाला होता. काही वाहनं वर्धमनेरीजवळ थांबण्यात आल्याने वर्धमनेरी ते सभास्थळापर्यन्त नागरिक पायदळ आली. आयोजकांनी सभा मंडपात ठिकठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली होती. सामाजिक संघटना व धार्मिक संस्थांच्या वतीने पार्किंगमध्ये पिण्याचे थंड पाणी वाटण्यात आले. कार्यक्रम संपल्यानंतर जवळपास दीड तास वाहतूक खोळंबली होेती.