डोकेबाज चिनी...हाडं-फुलांपासून बनविले हिरे !

diamond-red peonies-China किंमत खऱ्या हिऱ्यांपेक्षा जास्त

    दिनांक :19-Apr-2024
Total Views |
नवी दिल्ली,
 
 
diamond-red peonies-China निसर्गाच्या विरोधात जाऊन संशोधन करण्यात चिनी संशोधकांचा हात कोणीच धरू शकत नाही. सौरऊर्जेसाठी प्रतिसूर्य बनविण्याचा प्रयत्न असो किंवा घरात दैनंदिन वापराची उपकरणं, चिनी संशोधक भलताच डोकेबाजपणा करून वस्तू तयार करतात. diamond-red peonies-China आता त्यांनी सजीवांच्या हाडांतून आणि फुलांमधून कार्बन काढून, त्याचा हिरा बनविण्याचा यशस्वी प्रयोग केला आहे. त्यांनी बनविलेल्या ३ कॅरेट हिऱ्यांची किंमत ३५ लाख रुपयांपेक्षा जास्त असल्याचं सांगितलं जातंय.
 

diamond-red peonies-China 
(चीनमध्ये याच पेओनीच्या लाल फुलांपासून हिरा बनविण्याचा यशस्वी प्रयोग करण्यात आला - संग्रहित छायाचित्र) 
 
हा जगातील पहिला हाडं आणि फुलांपासून बनलेला हिरा ठरला आहे. diamond-red peonies-China लहानात लहान चिप बनविण्यापासून मोठमोठे रोबोट्स बनविणाऱ्या चीनच्या वैज्ञानिकांनी, लाल पेओनी फुलांमधील कार्बनचा अर्क काढून त्यापासून यशस्वीपणे हिरा बनविला आहे. diamond-red peonies-China पेओनी हे फूल आशियापासून युरोपपर्यंत आणि पश्चिम-उत्तर अमेरिकेत आढळते. हे फूल गुलाबी, पिवळ्या, पांढऱ्या, जांभळ्या आणि निळ्या रंगांसह लाल रंगातही आढळून येते. चीनच्या हेनान प्रांतातील लुओयांगमध्ये हा हिरा प्रदर्शनादाखल ठेवण्यात आला आहे.diamond-red peonies-China
 
 
बायोजेनिक कार्बन निष्कर्षण प्रक्रीयेतून फूलांमधून कार्बन तत्त्वं काढण्यात आली आहेत. या कार्बनकणांना विशिष्ट तापमान आणि दबावात हिऱ्यांमध्ये परिवर्तित केलं जातं. diamond-red peonies-China केवळ फूलंच नाही तर मानवी केस आणि हाडांपासूनही हिरे तयार केले जात आहेत. दरम्यान, ही प्रक्रीया खूप महागडी असल्याने अशा हिऱ्यांची निर्मिती मोठ्या प्रमाणावर करणे सध्या शक्य होणार नसल्याचे शास्त्रज्ञांनी नमूद केले आहे.