नरेंद्र मोदी यांच्या ‘गॅरंटी'ची निवडणूक !

modi ki guarantee kya hai अब की बार चारसौ पार

    दिनांक :19-Apr-2024
Total Views |
प्रासंगिक 
 
 
- मोरेश्वर बडगे
modi ki guarantee kya hai लोकसभा निवडणूक रंगात आली आहे. देशात सात टप्प्यात ही निवडणूक होत आहे. तिचा महाराष्ट्रातील निवडणुकीचा पहिला टप्पा आज १९ एप्रिलला आहे. या दिवशी पूर्व विदर्भातील नागपूरसह पाच मतदारसंघांत मतदान होणार आहे. दोन-अडीच महिने निवडणुकीची धावपळ चालेल. modi ki guarantee kya hai ४ जूनला निकाल यायचे आहेत. पण देशातील जनतेने केव्हाच मनाशी निकाल लावला आहे. या वेळची निवडणूक आतापर्यंतच्या निवडणुकांपेक्षा एकदम वेगळी आहे. सत्ताधारी पक्ष या आधी कधीही इतक्या प्रचंड आत्मविश्वासाने निवडणूक रिंगणात उतरला नव्हता. modi ki guarantee kya hai पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांची रालोआ सलग तिसऱ्यांदा जनमताचा कौल मागत आहे. मोदी पुढच्या २५ वर्षांचे नियोजन सांगत आहेत. इतक्या तयारीने याआधी कुठलाही राजकीय पक्ष जनतेपुढे गेला नव्हता. हॅट्ट्रिक करताना ‘अँटी इन्कम्बन्सी'चा धोका असतो; पण तुम्ही पाहाल. modi ki guarantee kya hai संपूर्ण निवडणूक नरेंद्र मोदी यांच्या भोवती फिरत आहे. उमेदवार गौण बनला आहे. मोदींना मत म्हणजे भाजपाला मत असे समीकरण तयार झाले आहे.
 
 

modi ki guarantee kya hai 
 
 
भाजपाने ‘अब की बार चारसौ पार'चा नारा दिला आहे. लोकसभेच्या एकूण ५४३ जागांपैकी ४०० पेक्षा अधिक जागा जिंकायचे भाजपाचे लक्ष्य आहे. महाराष्ट्रात ४८ जागा आहेत. त्यातल्या ४५ पेक्षा अधिक जागा जिंकायचे लक्ष्य आहे. मोदींना रोखण्यासाठी विरोधी पक्षांनी ‘इंडिया' नावाने आघाडी बनवली होती. modi ki guarantee kya hai मात्र, ती कागदावरच उरली आहे. भाजपा विरुद्ध काँग्रेस, मोदी विरुद्ध राहुल गांधी अशा वळणावर निवडणूक आली आहे. निवडणूक जेव्हा नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधी अशी होते, तेव्हा भाजपा फायद्यात राहते, असा गेल्या दोन निवडणुकांचा अनुभव आहे. या निवडणुकीत दोनच उत्सुकता आहेत. पहिली म्हणजे भाजपाची आघाडी ४०० पार करणार का? किती जागा मिळतील? भाजपा १५० जागांच्या आत गुंडाळली जाईल, असा राहुल गांधींचा दावा आहे. तसा ‘अंडर करंट' आहे, असे ते म्हणतात. modi ki guarantee kya hai दुसरी उत्सुकता म्हणजे केंद्रीय मंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ लोकप्रिय नेते नितीन गडकरी नागपुरात ५ लाख मतांचा लीड घेणार का? सट्टा बाजार गरम आहे. बाकी उत्सुकता संपल्या आहेत. गडकरी जिंकणारच हे राहुल गांधीही छातीवर हात ठेवून सांगतील. प्रश्न लीडचा आहे.
 
 
modi ki guarantee kya hai उमेदवारी अर्ज भरताना गडकरींनी नागपूरकरांना ५ लाख मतांचे आधिक्य मागितले. गेल्या दोन निवडणुकीत गडकरींनी दोन लाखांपेक्षा अधिकच लीड घेतला आहे. आता दुप्पट लीड घ्यायचा असेल तर मतदानही बम्पर लागेल. नागपुरात ६०-६५ टक्के या पलीकडे मतदान होत नाही. ५ लाखांचा लीड हवा तर ७५ टक्के मतदान झाले पाहिजे. त्याप्रमाणे भाजपाची यंत्रणा कामाला भिडली आहे. प्रवीण दटके निवडणूक प्रमुख आहेत. नागपूरच्या उन्हात भाजपाच्या बुथ मॅनेजमेंटची अग्निपरीक्षा आहे. गडकरींनी किती कामे केली, हा वादाचा विषय होऊ शकतो. modi ki guarantee kya hai मात्र, त्यांनी नागपूरला चमकवलं, चर्चेत आणलं हे नक्की. घरी बसूनही गडकरी आरामात जिंकले असते; पण प्रत्येक गोष्ट गडकरी गंभीरपणे घेतात, याची साक्ष पटली. त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार काँग्रेसचे नेते आमदार विकास ठाकरे यांच्यासाठी गमावण्यासारखे काहीही नाही. राज्यात इतरत्र प्रचारात कंबरेखालच्या लढाया सुरू आहेत. विकास ठाकरेंनी प्रचाराचा स्तर घसरू दिला नाही. आजच्या जमान्यात हेही नसे थोडके ! modi ki guarantee kya hai
 
 
कसा असेल निकाल? शरद पवार, उद्धव ठाकरे यांची नेतागिरी भंगारात काढायची, नाना पटोलेंना शेती करायला पाठवायचे हे लोकांनीच ठरवले आहे. मोदी तिसऱ्यां दा सत्तेत येणार हे लोकांच्या देहबोलीतून स्पष्ट झळकते आहे. देशभरातून आलेले वेगवेगळे सव्र्हेही हेच सांगतात. २०१४ च्या निवडणुकीत काँग्रेसला फक्त ४४ जागा जिंकता आल्या होत्या. गेल्या निवडणुकीत हा आकडा थोडा वाढून ५२ झाला. लोकसभेत विरोधी नेतेपदी बसायचे असेल तरी ५४ जागा खिशात पाहिजेत. modi ki guarantee kya hai काँग्रेसला तिथपर्यंतही पोहोचता आले नाही. जागांच्या वाढीचा दर पाहता काँग्रेस ७० जागा घेईल, असा काहींचा अंदाज आहे. मात्र, नेत्यांची उदासीनता पाहता काँग्रेसला पूर्वीपेक्षाही कमी जागा मिळतील. काँग्रेसला गेल्या वेळी मिळालेल्या ५२ जागांमधल्या ३१ जागा केरळ, तामिळनाडू आणि पंजाब या तीन राज्यांतून मिळाल्या होत्या. त्या वाढण्याचे कुठलेही ठोस कारण नाही. पंतप्रधानपदाचा राजमार्ग उत्तरप्रदेशातून जातो. modi ki guarantee kya hai उत्तरप्रदेशात सर्वाधिक ८० जागा आहेत. त्यातली एकही जागा काँग्रेसला मिळणार नाही. त्याला तशी कारणेही आहेत.
 
 
 
अमेठी, रायबरेली हे गांधी घराण्याचे परंपरागत हुकमी मतदारसंघ ! यावेळी गांधी घराण्यातला कोणी तिथे उभा राहील की नाही, याचा ठावठिकाणा नाही. ‘युवराज' राहुल गांधी केरळमधील वायनाड येथून उमेदवारी अर्ज भरून केव्हाच मोकळे झाले आहेत. नेहमी रायबरेलीतून लढणाऱ्या सोनिया गांधी यांनी या वयात हरण्यापेक्षा राज्यसभेत जाणे पसंत केले. modi ki guarantee kya hai त्यातून उलटा संदेश उत्तरप्रदेशात गेला आहे. आता राहुलबाबाने अमेठीतून अर्ज भरला तर स्मृती इराणींच्या हातून दुप्पट मार खातील. राहुल गांधी ही नोटाबंदीत रद्द झालेली ‘नोट' आहे. तरीही ती चालवण्याचा हट्ट काँग्रेसला मोडवत नाही. काँग्रेस नावाच्या पोपटाने केव्हाच मान टाकली आहे. साक्षात इंदिरा गांधी आल्या तरी आता काँग्रेस उठणे नाही. मतदारांच्याही हे लक्षात आले आहे. भाजपाच्या जागा वाढण्याला हे एक मोठे कारण असेल. modi ki guarantee kya hai माणूस जिंकणाऱ्या घोड्यावर पैसे लावतो. भाजपा हा जिंकणारा घोडा आहे. २०२४ च्या या लढाईत मोदींनी अश्वमेधाचा घोडा सोडला आहे. ही ग्रामपंचायत किंवा विधानसभेची निवडणूक नाही. देशाचा पंतप्रधान निवडायचा आहे. पंतप्रधानपदाचा आश्वासक आणि विश्वासार्ह चेहरा म्हणून देश आज मोदींकडे पाहत आहे.
 
 
 
तुम्ही लिहून ठेवा; दक्षिण भारतातही यावेळचे निकाल धक्कादायक असतील. महाराष्ट्रात महायुती ४२ जागांचे आपले ‘टार्गेटङ्क पूर्ण करील. modi ki guarantee kya hai शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना तोंड दाखवायला जागा उरणार नाही. महाविकास आघाडीचा बोèया वाजलेला दिसेल. पाडापाड्या होतील. महाविकास आघाडीमध्ये कोणीही खूश नाही. वसंतदादांचा नातू बंडाच्या तयारीत आहे. काँग्रेस तर संतप्त आहे; पण बोलणार कोणाला? सांगलीत परस्पर उमेदवार देऊन उद्धव ठाकरे यांनी केलेली ‘दादागिरी' त्यांच्यावर चांगलीच शेकणार आहे. बारामतीत मुलीला वाचवताना शरद पवारांची दमछाक सुरू आहे. बारामती पडली तर शरद पवारांचे राजकारणच संपते. modi ki guarantee kya hai ते होऊ नये यासाठी शरद पवार या वयात दारोदारी फिरत आहेत. आता बारामतीकर जुना हिशोब व्याजासह वसूल करतील. ५० वर्षांच्या राजकारणात शरद पवारांनी कित्येकांची घरं फोडली, तोडली. गेल्या निवडणुकीत युतीला कौल मिळाला असताना शरद पवारांनी भानामती केली.
 
 
उद्धव ठाकरेंना जाळ्यात ओढले. या वयातही खोड्या थांबलेल्या नाहीत. माढा मतदारसंघात महादेव जानकर यांना फोडण्याचा डाव देवेंद्र फडणवीस यांनी हाणून पाडला. विजय शिवतारे यांना शरद पवारांच्या तावडीतून सोडवून फडणवीस यांनी मोठे काम केले. शिवतारे यांना पवारांच्या तंबूतून सोडवले नसते तर अजितदादांच्या पत्नी सुनेत्रा पवार अडचणीत आल्या असत्या. modi ki guarantee kya hai ‘अकेला देवेंद्र क्या करेगा?' असे मागे सुप्रिया सुळे म्हणाल्या होत्या. देवेंद्र काय काय करू शकतो, हे पाहून सुप्रिया सुळेंना घाम फुटला असणार! आपण चाणक्य आहोत, हे फडणवीस यांनी पुन्हा एकवार दाखवून दिले आहे.