भोजशाळेत सापडली हिंदू चिन्हे

    दिनांक :02-Apr-2024
Total Views |
- याचिकाकर्त्यांचा दावा
 
धार, 
मध्यप्रदेशातील धार जिल्ह्यातील Bhojshala भोजशाळा-कमाल मौला मशीद संकुलात सुरू असलेल्या पुरातत्त्व विभागाच्या सर्वेक्षणात हिंदू धार्मिक चिन्हे आणि वस्तू असलेले तळघर सापडले असल्याचा दावा एका याचिकाकर्त्याने मंगळवारी केला. मात्र, दावा दिशाभूल करणारा असल्याचे मुस्लिम पक्षाने सांगितले. एका हिंदू संघटनेने दाखल केलेल्या अर्जाला उत्तर म्हणून मध्यप्रदेश उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार भारतीय पुरातत्त्व विभागाने 22 मार्च रोजी येथे सर्वेक्षण सुरू केले आहे. मध्ययुगातील या संरचनेवर हिंदू आणि मुस्लिम पक्षाने दावा केला असून, त्यातील सर्वेक्षणाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी नकार दिला आहे.
 
 
Bhojshala
 
Bhojshala : आजवर न दिसलेल्या गोष्टी आता समोर आल्या आहेत, असे याचिकाकर्ते कुलदीप तिवारी यांनी सांगितले. देवी सरस्वतीच्या गर्भगृहाच्या उजव्या बाजूला एक तळघर सापडले आहे. तोडफोड केलेल्या मूर्ती तिथे ठेवल्या जात होत्या. सर्वेक्षणात त्या सापडतील, असे तिवारी म्हणाले. ‘अष्टवक‘ कमळ’, संस्कृत शिलालेख, शंख आणि हवन कुंडाशिवाय भगवान हनुमानाची एक मूर्ती तळघरात आहे आणि भोजशाळा हे हिंदू मंदिर असल्याचे सूचित करते, असे तिवारी यांनी सांगितले. येथील खोदकाम थांबवण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशावर मुस्लिम पक्ष समाधानी आहे, असे कमाल मौला वेलफेअर सोसायटीचे अब्दुल समद यांनी सांगितले. हिंदू पक्ष माध्यमांमध्ये दिशाभूल करणारी माहिती पसरवत आहेत, असा आरोप त्यांनी केला.