सर्व 48 जागा जिंकून नरेंद्र मोदींना विजयाची महाभेट देऊ

    दिनांक :02-Apr-2024
Total Views |
- भाजपा निवडणूक प्रभारी खा. दिनेश शर्मा यांचा विश्वास

मुंबई, 
Dinesh Sharma : राज्यात भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस यांची महायुती लोकसभेच्या सर्व 48 जागा जिंकण्याच्या निर्धाराने मैदानात उतरली आहे. भाजपाचे कार्यकर्ते सर्व जागा जिंकून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विजयाची महाभेट देतील, असा विश्वास भाजपाचे प्रदेश निवडणूक प्रभारी खा. डॉ. दिनेश शर्मा यांनी मंगळवारी व्यक्त केला.
 
 
dinesh sharama
 
भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रपरिषदेत शर्मा बोलत होते. शर्मा यांनी सांगितले की, यावेळची निवडणूक मोदीमय झाली आहे. देशातच नव्हे तर जगभरात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाचा बोलबाला आहे. राम मंदिर निर्मिती, 370 वे कलम निष्प्रभ करणे यासारख्या निर्णयांमुळे नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व झळाळून उठले आहे. केंद्र सरकार आणि भाजपाशासित राज्यांच्या सुशासनामुळे जनतेचा राष्ट्रीय लोकशाही आघाडीवरील विश्वास वाढला आहे. महाराष्ट्रातही नरेंद्र-देवेंद्र या जोडीच्या जादूमुळे मतदार महायुतीला मोठा विजय मिळवून देतील, असे वातावरण आहे.
 
 
खा. शर्मा यांनी यावेळी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले. ते म्हणाले की, बाळासाहेब ठाकरे यांनी काँग्रेसला नेहमीच प्रखर विरोध केला. हिंदुत्वाचे कडवे समर्थक असलेल्या बाळासाहेबांना काँग्रेसचे हिंदुविरोधी रूप माहीत होते. उद्धव ठाकरे यांनी मात्र मुख्यमंत्रिपद मिळवण्यासाठी राम मंदिराला विरोध करणार्‍या काँग्रेसशी हातमिळवणी करीत मतदारांचा विश्वासघात केला. या विश्वासघाताला मतदार निवडणुकीत योग्य उत्तर देतील. मतदारांमध्ये महाविकास आघाडीबद्दल असलेल्या संतापामुळे उबाठा, काँग्रेस आणि शरद पवारांच्या महाविकास आघाडीचा निवडणुकीत धुव्वा उडेल. हिंदुविरोधी काँग्रेसने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना लोकसभा निवडणुकीत कसे पराभूत केले, हा इतिहास महाराष्ट्राला ठाऊक आहे. अशा आंबेडकरविरोधी मंडळींशी उद्धव ठाकरे यांनी आघाडी करावी, ही गोष्ट राज्यातील शोषित, वंचित जनतेला आवडली नाही. ही जनता त्यांना निवडणुकीत धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही, असेही Dinesh Sharma खा. शर्मा यांनी नमूद केले.