जागावाटपातच काँग्रेसची ‘हाता'तोंडाची गाठ !

Election 2024-Congress प्रबळ दावेदाराचे आव्हान

    दिनांक :02-Apr-2024
Total Views |
प्रासंगिक
 
 
- राहुल गोखले
Election 2024-Congress कितीही आव आणला तरी अनेक राज्यांत काँग्रेसचा जनाधार आक्रसत चालला आहे, हे वास्तव आहे. याला पुष्टी देणारा पुरावा म्हणजे अनेक प्रादेशिक पक्षांनी आपापल्या राज्यांत जागा वाटपात काँग्रेसची अत्यल्प जागांवर केलेली बोळवण. बिहारमधील ४० जागांपैकी २६ जागांवर राष्ट्रीय जनता दल (राजद) निवडणूक लढवेल; तर काँग्रेसच्या वाट्याला अवघ्या ९ जागा आल्या आहेत. Election 2024-Congress गेल्या लोकसभा निवडणुकीत (२०१९) काँग्रेसला बिहारमध्ये किशनगंज या एकाच जागेवर विजय मिळाला होता. यावेळी त्या जागेसह भागलपूर, मुजफ्फरपूर, महाराजगंज, समस्तिपूर इत्यादी जागा काँग्रेसकडे आल्या आहेत. गेल्या वेळी एक जागा जिंकूनही यावेळी जागावाटपात नऊ जागा काँग्रेसच्या वाट्याला याव्यात हे वरकरणी आश्चर्यकारक वाटेल. मात्र, राजद नेतृत्वाने काँग्रेसला अशा जागा दिल्या आहेत जेथे काँग्रेसचे अस्तित्व केवळ क्षीणच नव्हे तर तेथील जातीय समीकरणे संयुक्त जनता दल (जेडीयू)-भाजपा आघाडीस पोषक आहे. Election 2024-Congress या ९ पैकी ७ जागा अशा आहेत, जेथे काँग्रेसने गेल्या अनेक वर्षांत एकदाही विजय मिळविलेला नाही. मुजफ्फरपूर जागा काँग्रेसने शेवटची जिंकली ती १९८४ साली; तर महाराजगंजमध्ये काँग्रेसने यशाची शेवटची चव १९८४ साली चाखली.
 
 

Election 2024-Congress 
 
 
Election 2024-Congress पूर्णिया जागेबद्दल काँग्रेस आग्रही होती. याचे कारण पप्पू यादव यांनी नुकताच काँग्रेसमध्ये केलेला प्रवेश. त्यांनी या मतदारसंघातून १९९० च्या दशकानंतर तीनदा निवडणूक qजकली आहे. त्यामुळे जेव्हा पप्पू यादव यांनी आपला जनाधिकार पक्ष काँग्रेसमध्ये विलीन केला तेव्हा साहजिकच पूर्णिया मतदारसंघ काँग्रेसकडे येणार, अशी अपेक्षा व्यक्त होत होती. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे राहुल आणि प्रियांका गांधी यांच्या निमंत्रणावरून यादव यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. याचाच अर्थ पूर्णिया मतदारसंघ काँग्रेसला नाकारणे हा अप्रत्यक्षपणे राहुल-प्रियांका यांचा राजदने केलेला उपमर्दच ! Election 2024-Congress पप्पू यादव आता बंडखोरी करणार की अपक्ष म्हणून निवडणूक लढविणार; तसे झाल्यास महाआघाडीचे काय होणार इत्यादी प्रश्न उपस्थित होत असले, तरी त्यापेक्षा गंभीर प्रश्न आहे; तो राजदने गांधी कुटुंबाच्या सदस्यांच्यादेखील तोंडाला पाने पुसण्याचा. पूर्णिया हा एक मतदारसंघ काँग्रेसच्या आग्रहाखातर राजद सोडण्यास राजी नाही; यावरूनच काँग्रेस आणि त्या पक्षाचे नेतृत्व यांची प्रादेशिक मित्र पक्षांच्या लेखी किती किंमत आहे याची कल्पना करता येऊ शकेल. Election 2024-Congress गेल्या वर्षीच्या सप्टेंबर महिन्यात लालूप्रसाद यादव यांच्याकडून ‘चंपारण मटण'ची पाककृती शिकतानाची चित्रफीत राहुल गांधी यांनी समाजमाध्यमांवरून प्रसारित केली होती.
 
 
 
नंतर कधी ती राहुल यांनी स्वतंत्रपणे करून पाहिली की नाही याबद्दल इतरांना स्वारस्य असण्याचे कारण नाही. त्याचवेळी लालू यांच्या राजकीय चाणाक्षपणाबद्दल आपल्याला आदर असल्याचेही राहुल यांनी म्हटले होते. त्या चाणाक्षपणाचा (की धूर्तपणाचा?) अनुभव राहुल गांधी यांना आता बिहारमधील जागावाटपात आला असेल. Election 2024-Congress जी बाब बिहारची तीच उत्तर प्रदेशची. समाजवादी पक्षाने जागावाटपात काँग्रेसची बोळवण केवळ १७ जागांवर केली आहे. एका वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार स्वातंत्र्यानंतरच्या निवडणुकांच्या इतिहासात एवढ्या नीचांकी जागांवर निवडणूक लढविण्याची काँग्रेसची ही पहिलीच वेळ आहे. बिहारप्रमाणेच उत्तर प्रदेशातदेखील आपल्या पक्षाची स्थिती कशी सुधारायची, याचे ‘उत्तर' काँग्रेसकडे नाही. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत एकमात्र जागेवर त्या पक्षाला यश मिळाले; ती म्हणजे सोनिया गांधी यांनी जिंकलेली रायबरेलीची जागा. यंदा तर सोनिया गांधी यांनीही लोकसभा निवडणुकीत न उतरण्याच्या निर्णय घेतला आहे. Election 2024-Congress अमेठीत गेल्या वेळी राहुल गांधी यांचा पराभव भाजपा उमेदवार स्मृती इराणी यांनी केला होता. यावेळी तेथून त्याच भाजपाच्या उमेदवार असणार आहेत; काँग्रेसने मात्र आपल्या उमेदवाराचे नाव अद्याप जाहीर केलेले नाही.
 
 
Election 2024-Congress या मतदारसंघात ५ मे रोजी मतदान होणार असल्याने तेथे उमेदवार जाहीर करण्याबाबत काँग्रेस चालढकल करीत असली, तरी त्यातून संदेश जातो तो आत्मविश्वासाच्या अभावाचा. राहुल गांधी यांनी खरे तर आव्हान स्वीकारून अमेठीतून निवडणूक लढणे गरजेचे. नेत्यानेच पलायन केले तर पक्षाचे दुय्यम नेते आणि कार्यकर्ते जिवाचे रान करून लढतील, अशी अपेक्षा करणे व्यर्थ ! काँग्रेसचे निवडणूक चिन्ह ‘हाताचा पंजा' हे असले, तरी अमेठीच्या बाबतीत तूर्तास तरी झाकली मूठ सव्वा लाखाची, अशी त्या पक्षाची भूमिका दिसते. अशा स्थितीत मित्रपक्ष काँग्रेसला किंमत  देतील, अशी अपेक्षाही करणे चुकीचे ! बिहार आणि उत्तर प्रदेशातील काँग्रेसच्या स्थितीतील आणखी एक साम्य म्हणजे दोन्ही राज्यांत आपल्या यशासाठी त्या त्या ठिकाणच्या प्रादेशिक मित्र पक्षांवर भिस्त ठेवणे अपरिहार्य असणे. Election 2024-Congress आघाडी केली याचा अर्थ पक्षांची एकूण ताकद तुल्यबळ असावी, असे नसले तरी राज्याच्या काही मतदारसंघांत तरी कनिष्ठ भागीदार पक्षाची काही तरी ताकद असणे अभिप्रेत आहे. काँग्रेसची मात्र सारी मदार मित्रपक्षांच्या संघटनेवर आणि जनाधारावर आहे. ही भीषण परिस्थिती सुधारण्यासाठी सर्वोच्च नेतृत्वाने मेहनत घेण्यास पर्याय नाही. त्याऐवजी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खडगे यांच्यापासून राहुल गांधी यांच्यापर्यंत सर्व जण इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांवर खापर फोडण्याची तयारी करीत आहेत.
 
 
पक्ष मजबूत करण्याऐवजी अशाच सबबींवर नेते समाधान मानत राहिले तर काँग्रेसची स्थिती आणखीच घसरेल आणि कामगिरी सुमार राहील, हे भाकीत करण्यासाठी सामान्य बुद्धीदेखील पुरेशी आहे. Election 2024-Congress उत्तर प्रदेशात काँग्रेसची अशी दारुण स्थिती होण्याची ही पहिलीच वेळ आहे असे नाही. आणिबाणीनंतर म्हणजे १९७७ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने त्यावेळेच्या सर्व ८५ जागा गमावल्या होत्या. १९९८ सालच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला उत्तर प्रदेशात एकही जागा जिंकता आलेली नव्हती. मात्र, या दोन्ही दारुण पराभवानंतर उत्तर प्रदेशात काँग्रेस काहीशी सावरली. १९८० च्या निवडणुकीत काँग्रेसने ५१ जागा जिंकल्या होत्या; तर १९८४ साली इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर उसळलेल्या सहानुभूतीच्या लाटेत काँग्रेसने त्या राज्यात ८३ जागा जिंकून विरोधकांचा पाचोळा करून टाकला होता. तथापि, त्यावेळची राजकीय स्थिती आणि समीकरणे निराळी होती. Election 2024-Congress आता काँग्रेसची संघटनात्मक ताकद नाही; नेतृत्वाचा करिष्मा नाही आणि मुख्य म्हणजे भाजपासारख्या सत्तेच्या प्रबळ दावेदाराचे आव्हान समोर उभे आहे. परिणामतः गेल्या काही निवडणुकांमध्ये काँग्रेसने जिंकलेल्या जागांतच घट होते आहे, असे नाही तर त्या पक्षाकडून लढविल्या जाणाऱ्या जागांमध्येही लक्षणीय घट होत आहे. २००४ साली उत्तर प्रदेशात काँग्रेसने ७३ जागा लढविल्या होत्या.
 
 
त्यापैकी नऊच जागा पक्षाला जिंकता आल्या होत्या. त्याच निवडणुकीनंतर केंद्रातील भाजपा सरकारला पायउतार व्हावे लागले होते आणि काँग्रेसप्रणीत संयुक्त पुरोगामी आघाडी (युपीए) सरकार सत्तेत आले होते. मात्र, त्यावेळीही उत्तर प्रदेशने काँग्रेसला ‘हात' दिलेला नव्हताच. २०१४ च्या निवडणुकीत काँग्रेसने ६६ जागा लढविल्या आणि दोन जिंकल्या तर २०१९ च्या निवडणुकीत त्या पक्षाने ६७ जागा लढवून एकमात्र जागा जिंकली. हा आलेख आता केवळ १७ जागा लढविण्याच्या टप्प्यावर येऊन ठेपला आहे. Election 2024-Congress त्यातही राजदप्रमाणे समाजवादी पक्षाने जागावाटपात मखलाशी केली आहे. काँग्रेसला ज्या जागा दिल्या आहेत त्यापैकी बहुतांशी ठिकाणी काँग्रेसच्या उमेदवारांची अनामत रक्कम गेल्या वेळी जप्त झाली होती. ज्या वाराणसी मतदारसंघात नरेंद्र मोदी भाजपाचे उमेदवार आहेत ती जागा समाजवादी पक्षाने काँग्रेसला देण्याचा अर्थ हमखास अपयश येणाऱ्या जागा काँग्रेसला देणे हाच होय. समाजवादी पक्ष काय किंवा राजद काय त्यांच्यासमोर आडमुठेपणाचे धोरण स्वीकारून आपल्या पसंतीच्या जागा मिळवून घेण्याचीही ताकद काँग्रेसपाशी राहिलेली नाही. Election 2024-Congress मित्र पक्षच काँग्रेसची अशी वासलात लावणार असतील तर मतदार काँग्रेसची किंमत ठेवणे दुरापास्त !
 
९८२२८२८८१९