विकासाला प्राधान्य देईल त्याचा विचार करू

* विदर्भ किसान मजदूर काँगे्रसचे पुगलिया यांचे मत

    दिनांक :02-Apr-2024
Total Views |
तभा वृत्तसेवा
चंद्रपूर,
Former MP Naresh Puglia : जो विकासाला प्राधान्य देईल. चंद्रपूर जिल्ह्यातील विविध रखडलेल्या कामांना गतिशील करेल. दमदारपणे संसदेत आवाज बुलंद करू शकेल, अशा उमदेवाराचा विचार आम्ही करू, असे मत विदर्भ किसान मजदूर काँगे्रसचे अध्यक्ष तथा माजी खासदार नरेश पुगलिया यांनी पत्रकारांशी संवाद साधताना व्यक्त केले.
 

saj 
 
 
ते म्हणाले, चंद्रपूर महानगरालगतच्या इरई व झरपट नद्यांचे खोलीकरण, इरई नदीला दोन्ही बाजूने सुरक्षा भिंत, तर दाताळा पुलाजवळ बंधार्‍याचे तसेच जिल्ह्यातील वर्धा, उमा, अंधेरी व वैनगंगा नद्यांवर बॅरेजचे बांधकाम रखडलेले आहे. खनिज विकासाचा राज्याच्या एकूण निधीपैकी 40 टक्के निधी जिल्ह्याचा असतो. या निधीचा उपयोग जिल्ह्यातील नद्यांंवरील बंधारे बांधण्यासाठी करण्यात यावा, बल्लारपूर पेपर मिलला कच्चा माल बाहेरच्या राज्यातून आणावा लागतो. त्यामुळे बल्लारपूर पेपर मिल डबघाईस आला असून, वनविभागाने मऊ लाकडाची लागवड केल्यास शेकडो कोटींचे उत्पन्न वनविभागाला मिळेल. शिवाय कच्चा मालाचाही प्रश्‍न संपृष्टात येईल. चंद्रपुरातील प्रशस्त वैद्यकीय महाविद्यालयाची इमारत नाही. त्याचे बांधकाम त्वरित पूर्ण करावे, जिल्ह्यातील बेरोजगार युवकांच्या रोजगारासाठी नवा उद्योग आणण्याची गरज आहे. म्हाडा वसाहतीमध्ये रस्त्याचे डांबरीकरण, पथदिवे, पाणी पुरवठा करण्यात यावा, जिल्ह्यातील विमानतळाचा प्रश्‍न निकाली काढावा. हुमन सिंचन प्रकल्प, गोसेखुर्द धरणाचा उजवा कालवा, राजुरा तालुक्यातील भेंडाळा प्रकल्पाला मंजुरी मिळाली. पण, तो प्रकल्प अद्याप मार्गी लागला नाही. चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभेतील राष्ट्रीय महामार्गाची अपूर्ण कामे पूर्ण करण्यात यावी, मार्कंडा देवस्थानच्या विकासासाठी केंद्र शासनाने निधी दिला. पण, पुरातन विभागाने अडचण निर्माण केली. असे अनेक प्रश्‍न प्रलंबित आहेत. हे प्रश्‍न सेाडविण्याची ग्वाही जो देईल, त्यांचा विचार होईल, असेही पुगलिया म्हणाले.
 
माझ्याकडे काँगे्रसची प्राथमिक सदस्यताही नाही
 
गत लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी यांच्या सभास्थळी आमच्यावर अन्याय झाला. तेव्हापासून आम्ही आमची वेगळी चुल मांडली. सध्या मी काँगे्रसचा प्राथमिक सदस्यही नाही. मात्र, काँगे्रसची विचारधाराही सोडली नाही. गांधी कुटुंबियांशी संबंध व संवाद आहेच, असेही पुगलिया यांनी सांगितले.