लोकसभा अपक्ष उमेदवाराने पोते भरून आणली ‘चिल्लर’

    दिनांक :02-Apr-2024
Total Views |
- साडेबारा हजारांची नाणी केली जमा

यवतमाळ, 
आपल्या विविध आंदोलनांनी नेहमी चर्चेत असणार्‍या Manoj Gedam मनोज गेडाम यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरताना तब्बल 12 हजार 500 रुपयांची पोतंभर चिल्लर आणून कर्मचार्‍यांची चांगलीच दमछाक केली. अनेक हवसे-गवसे निवडणुकीसाठी नामांकन दाखल करताना आपल्या नावाची चर्चा व्हावी, यासाठी वेगवेगळे प्रयोग करीत असतात. त्याचाच एक भाग म्हणून सोमवारी अपक्ष उमेदवार मनोज गेडाम यांनी नामांकन अर्जासोबत अनामत रक्कम म्हणून 12 हजार 500 रुपयांची नाणी कर्मचार्‍यांना दिली.
 
 
y2Apr-Gedam
 
Manoj Gedam गेडाम यांनी ही रक्कम आदिवासी, पारधी व गोरगरीबांनी दिली असल्याचे सांगितले. त्यामुळे अनामत रक्कम म्हणून आणलेली नाणी मोजण्याची वेळ कर्मचार्‍यांवर आली. अधिकारी, कर्मचार्‍यांकडून बराच वेळ ही नाणी मोजण्याचे काम सुरू होते. वेळेत चिल्लर मोजल्या जात नसल्यामुळे अधिकार्‍यांनी मनोज गेडाम यांनाच चिल्लर मोजायला सांगितली. नाणी मोजण्यात वेळ गेल्याने अधिकार्‍यांनी नामांकन अर्जाची पडताळणी केली व अर्ज ठेवून घेतला. तसेच गेडाम यांना मंगळवारी रक्कम आणायला सांगितली. मनोज गेडाम यांनी मंगळवार, 2 एप्रिल रोजी चिल्लर रक्कम जमा करून नामांकन दाखल केल्याची पावती घेतली.