निवडणुकीमुळे पो. उपनिरीक्षकपदाची शारीरिक चाचणी पुढे ढकलली

    दिनांक :02-Apr-2024
Total Views |
मुंबई, 
Po. Physical Test : लोकसभा निवडणुका 19 एप्रिल ते 1 जून या दरम्यान सात टप्प्यांत होत आहेत. निकाल 4 जूनला जाहीर होतील. त्यामुळे या काळात होणार्‍या एमपीएससीच्या परीक्षांचे वेळापत्रक बदलण्याचा निर्णय महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने घेतला आहे. लोकसेवा आयोगामार्फत नवी मुंबई पोलिस मुख्यालयात पोलिस उपनिरीक्षक पदासाठी निवड करण्यात आलेल्या उमेदवारांची शारीरिक चाचणी घेतली जाणार होती. मात्र, निवडणुकीच्या पृष्ठभूमीवर 19, 26 आणि 27 एप्रिल रोजी होणार्‍या शारीरिक चाचणी कार्यक्रमात बदल करण्यात आला आहे. त्या ऐवजी 29, 30 एप्रिल आणि 2 मे रोजी या चाचण्या होणार आहेत.
 
 
M-police
 
Po. Physical Test : एमपीएससीकडून जाहीर करण्यात आलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा-2022 मधील पोलिस उपनिरीक्षक संवर्गाच्या शारीरिक चाचणीचा कार्यक्रम 15 ते 27 एप्रिल या कालावधीत आयोजित करण्यात आला होता. कार्यक‘म जाहीर करताना निवडणुकीतील मतदानाचे टप्पे विचारात घेऊन त्या-त्या टप्प्यातील उमेदवारांना अन्य दिवशी शारीरिक चाचणीसाठी बोलावण्यात आले होते. तथापि, निवडणूक आयोगाकडील प्राप्त निवेदने विचारात घेता 19, 26 व 27 एप्रिल रोजीच्या उमेदवारांची शारीरिक चाचणी अनुक्रमे 29, 30 एप्रिल व 2 मे या दिवशी पोलिस मुख्यालय नवी मुंबई येथे घेण्यात येणार आहे. शारीरिक चाचणीचा सुधारित सविस्तर कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येईल.