पुसद येथील जिप व्यापार संकुलात अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळला

    दिनांक :02-Apr-2024
Total Views |
तभा वृत्तसेवा
पुसद, 
Pusad Jeep Trade Complex : वसंतनगर पोलिस ठाण्यांतर्गत येणाèया पुसद-दिग्रस रस्त्यावरील नवीन पंचायत समिती इमारतीलगत असलेल्या जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग दोनच्या मालकीच्या व्यापार संकुलाच्या दुकानासमोर एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे.
 

y2Apr-Sankul 
 
 
मृतदेहाची दुर्गंधी येत असून या व्यक्तीचा मृत्यू नेमका कधी झाला हे सध्या कळले नाही. परिसरातील व्यापारी व अन्य नागरिकांनी घटनेची माहिती वसंतनगर पोलिसांना दिली. या संदर्भात पंचायत समितीचे गटविकास अधिकाèयांना भ्रमणध्वनीवर सूचना मिळताच त्यांनीही याची दखल घेत संबंधितांना सूचना केल्या.
 
हे व्यापार संकुल बेवारस अवस्थेत असून या ठिकाणी असामाजिक तत्वांचा वावर मोठ्या प्रमाणात दिसून येत असतो. या ठिकाणी सातत्याने संध्याकाळ दरम्यान मोठ्या प्रमाणात व्यसनाधीन लोकांची गर्दी असते. जिल्हा परिषद बांधकाम विभागाने या संदर्भात गांभीर्याने लक्ष देऊन या ठिकाणी सुरक्षा रक्षक नेमणे गरजेचे आहे.
 
हे व्यापार संकुल बांधून अनेक वर्षे झाली आहेत. वादग्रस्त ठरलेल्या या व्यापार संकुलाचा योग्य उपयोग होणे गरजेचे आहे. जेणेकरून शासनाच्या लाखो रुपयांच्या निधीचा सदुपयोग होईल.