वृक्ष वाचविण्यासाठी ‘बिहार पँटर्नचा’ अवलंब !

02 Apr 2024 19:11:59
वाशीम, 
SMC English School, : पर्यावरण क्षेत्रात जनजागृती करण्यात अग्रगण्य असणार्‍या स्थानिक एस. एम. सी. इंग्लिश वाशीमच्या राष्ट्रीय हरित सेनेच्या चिमुकल्यांनी प्राचार्य मीना उबगडे व राष्ट्रीय हरित सेनेचे समन्वयक अभिजीत जोशी यांच्या मार्गदर्शनात जल संधारणाच्या कार्यक्रमा अंतर्गत शाळेच्या परिसरात बिहार पँटर्नचा अवलंब करण्यात आला.
 
 
 
FJskj
 
 
 
या अंतर्गत झाडाच्या बुंध्याशी एक फुट अंतरावर खड्डा करुन त्यामध्ये बिसलरी किंवा साध्या बाटलीला बुडाशी एक छिद्र पाडण्यात आले असून, त्यात सुतळीची, कापसाची किंवा कापडाची एक वात तयार करुन ही वात झाडाच्या बुंध्याशी ठेवून बाटलीत पाणी भरुन ठेवल्या नंतर हे पाणी जवळपास वातीच्या माध्यमातून झाडांना सलाईन सारखे काम करते. हे पाणी झाडांना दोन ते तीन दिवस पर्यंत सहज पुरते. सध्या असणारा तीव्र उन्हाळा व तापमान जवळपास ४० अंशा पर्यंत पोहचले आहे, तसेच संभाव्य पाणी टंचाईमुळे झाडांना जे पाणी इतर माध्यमातून दिले जाते, त्याच्या जवळपास ९० टक्के पाण्याचे बाष्पीभवन होते. परंतु, या पध्दतीचा अवलंब केल्यामुळे पाण्याची बचत तर होतेच शिवाय वृक्षांचे संवर्धन सुद्धा होते. अशा प्रकारच्या बिहार पँटर्नचा अवलंब इतरांनी करून तीव्र उन्हापासून व संभाव्य पाणी टंचाई पासुन झाडांचे संरक्षण व संवर्धन करावे असे आवाहन प्राचार्य मीना उबगडे व राष्ट्रीय हरित सेनेचे समन्वयक अभिजीत मुकुंदराव जोशी व हरित सेनेच्या चिमुकल्यांनी केले आहे.
Powered By Sangraha 9.0