बनावट दस्त तयार करून एकाच जमिनीची दोनदा विक्री

    दिनांक :02-Apr-2024
Total Views |
तभा वृत्तसेवा
उमरखेड,
Sale of fake deed land : उमरखेड खंड २ मधील शेती भूमापन क्रमांक १७०/१ अ क्षेत्रफळ एक हेक्टर ५७ आर असलेल्या शेतीचे बनावट दस्त तयार करून एकाच जमिनीची दोनदा विक्री केल्याप्रकरणी दस्तलेखकासह सातजणांवर गुन्हे दाखल करण्यात आले. या जमिनीचा पूर्व पश्चिम धुरा पाडून यातील ४० आर उमरखेड बिटरगाव रस्त्यालगतची शेतजमीन ४ जून २०२० रोजी नोंदणीकृत दस्त क्रमांक ७४९ / २०२० द्वारे तक्रारदार सैफुल्लाखान गुलाबखान राहणार महात्मा फुले वार्ड उमरखेड व इतर नऊ व्यक्तींना विक्री केली होती.
 
 
xfg
 
 
परंतु त्या शेतीचा महसूली फेरफार प्रलंबित असल्याचा गैरफायदा घेत ८ ऑगस्ट २०२२ रोजी आधी विक्री केलेल्या शेतीचा उत्तर-दक्षिण धुèयाकडून पश्चिम भागातील ५५ आर शेतजमिनीचे खोटे नोंदणीकृत खरेदीखत दस्त तयार करून तब्बल ८ लाखांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उमरखेड पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरून उजेडात आला आहे. यातील आरोपीने आधी नोंदणीकृत दस्तऐवज करून विक्री केलेल्या शेतीचा सातबारा नवीन मालकाच्या नावे झाला नाही. याचा फायदा घेत ही शेती पुन्हा दुसèयाला विक्री करून तक्रारदार व सोबत इतर ९ लोकांची एकूण आठ लाखांनी फसवणूक केल्याने दस्त लेखकासह सात आरोपींवर गुन्हा नोंद केला.
 
 
या संदर्भात दिलेल्या तक्रारीवरून पोलिस ठाणे उमरखेड येथे २० मार्च रोजी गुन्हा नोंदवण्यात आला. दुयम निबंधक कार्यालय तसेच तलाठी कार्यालय यांच्याकडून गुन्ह्याच्या अनुषंगाने कागदपत्रे मागविण्यात आलेली असून आरोपींविरुद्ध पुरावा गोळा करणे सुरू आहे. गुन्ह्याचा तपास पोलिस ठाणेदार संजय सोळंके यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक नीलेश सरदार करीत आहेत.